… म्हणून ‘या’ अभिनेत्रीने चाळीशी उलटल्यानंतर केलं लग्‍न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्राने ४२ वर्षात लग्न केले आहे. पूजाने गुपचुप लग्न केले आणि जेव्हा लग्नाचे फोटो इंटरनेटवर शेअर केले तेव्हा सगळीकडे चर्चा सुरु झाली. पूजाने एवढ्या उशीरा लग्न का केले ? तेही कोणाला न सांगता. यावर तिने लग्न झाल्यानंतर मनमोकळ्यापणाने बोलली आहे.

View this post on Instagram

Man Crush Everyday @nawwabshah

A post shared by Pooja Batra (@poojabatra) on

एका मुलाखतीमध्ये पूजाने सांगितले की, हो आम्ही लग्न केले आहे. मी आणि नवाबने दिल्लीमध्ये लग्न केले आहे. आमच्या लग्नात केवळ आमचा परिवार सहभागी होता. माझे फ्रेंड्स मला विचारत होते की, मी एवढ्या उशीरा लग्न का केले ? मी सामान्यपणे माझे जीवन जगत होते. तेव्हा मला असे जाणवले की, हाच तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत मी माझे बाकी आयुष्य घालवू शकते. यानंतर लग्न टाळण्याचे कोणतेच कारण नव्हते. आम्ही आर्य समाज मंदिरामध्ये लग्न केले आणि या आठवड्यात आम्ही लग्नाचे रजिस्टर करणार आहोत.

पूजा आणि नवाब एकमेकांना पाच महिन्यापासून डेट करत होते. एवढ्या लवकर लग्नाचा निर्णय घेण्याचे पूजाने सांगितले की, मी नवाबला एकाच प्रोफेशनमध्ये ओळखत होते. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात आमची भेट एका कॉमन मित्राने करुन दिली. मला वाटते की, आम्ही परफेक्ट वेळी एकमेकांना भेटलो आहे. आमच्या काही सवयी मिळत्या-जुळत्या होत्या त्यामुळे आम्ही लवकर एकमेकाच्या जवळ आलो.

View this post on Instagram

In your corner #selfie

A post shared by Pooja Batra (@poojabatra) on

पूजाने सांगितले की, ‘मी नेहमीच नवाबचा सन्मान करत होते आणि त्यांना लाइक करत होते. माझ्या मनात कुठे न कुठेतरी असे वाटत होते की, आमच्यामध्ये मैत्रीपेक्षा ही जास्त काही होऊ शकते. आमच्या काही सवयी एकसारख्या होत्या त्यामुळे आम्हाला एकमेकांना समजण्यास जास्त वेळ लागला नाही. मला आनंद वाटतो की, नवाब माझ्या परिवारातील व्यक्ती आहे.’

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like