Photo : ४२ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने केलं गुपचूप लग्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकेकाळची बॉलिवूडमधील टॉप अॅक्ट्रेसपैकी असणारी पूजा बत्राबाबत चकित करणारी बातमी समोर आली आहे. मीडियापासून अंतर ठेवून असणाऱ्या पूजाने 42 व्या वर्षी लग्न केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरची खूप चर्चा झाली. परंतु कोणालाही असे वाटले नव्हते की, ती अचानक लग्न करेल. पूजाने ज्या व्यक्तिसोबत लग्न केलं आहे तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध अॅक्टर आहे. अनेक मोठ्या सिनेमात तो दिसला आहे. दोघांच्याही लग्नाची बातमी फक्त सूत्रांच्या हवाल्याने दिली जात आहे. दोघांपैकी कोणीही याबाबत ऑफिशियल अनाऊंसमेंट केलेली नाही.

अभिनेत्री पूजा बत्राने 2002 मध्ये सर्जन डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केलं होतं. यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. परंतु हे लग्न जास्त दिवस टिकू शकले नाही. 9 वर्षांनंतर पूजाचा आणि सोनूचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दीर्घकाळानंतर पूजा बॉलिवूड अॅक्टर नवाब शाहला भेटली. ही ओळख नंतर हळूहळू प्रेमात बदलली.

दोघेही सोशल मीडियावर अनेक प्रेम व्यक्त करणारे फोटो शेअर करत असतात. जेव्हापासून या दोघांच्या लग्नाची माहिती समोर आली आहे तेव्हापासून दोघांचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

नुकताच एका एंटरटेंमेंट पोर्टलने दावा केला आहे की, या सुपरहॉट कपलने गुपचूप लग्न केलं आहे. स्पॉटबॉय ई ने दिलेल्या वृत्तानुसार, पूजा बत्रा आणि नवाब शाहने जम्मू काश्मीरमध्ये लग्न केलं आहे. याच वर्षी ईदनिमित्त नवाबने इंस्टाग्रामवर पूजासोबत फोटो शेअर केला होता आणि आपले नाते कबुल केले होते. नवाबने दोघांचा एक फोटो शेअर केला होता आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, त्याला 46 वर्षांनंतर सोलमेट भेटली आहे.

पूजा बत्रा माजी फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल आहे. तिने विरासत, नायक, हसीना मान जाएगी, भाई, फर्ज आणि एबीसीडी 2 यांसारख्या अनेक सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नवाब शाहदेखील काही कमी नाही. नवाबने भाग मिल्खा भाग, डॉन 2, दिलवाले, तसेच सलमान खान सोबत टायगर जिंदा है या सिनेमात काम केले आहे. असेही समजत आहे की, दोघे आता दबंग 3 मध्ये दिसणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

मुळव्याधाने त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

सिनेजगत

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणुकीचा FIR

शर्टचं बटण खोलत उर्वशी रौतेलाने दाखवलं ‘क्लिव्हेज’ ; चाहते म्हणाले , ‘रेखा सारखी दिसतेस’

सेक्रेड गेम्स मधील ‘या’ अभिनेत्रीने केलं ‘हॉट फोटोशुट’ !

बहुजननामा

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आघाडी काळात रखडलेल्या मराठा मुलांना न्याय, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे का ? यावर अशोक चव्हाण यांनी दिले उत्तर

Loading...
You might also like