आईच्या बॉयफ्रेन्डसोबस असलेल्या नात्याबद्दल पुजा बेदीची मुलगी अलियानं सांगितलं, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला लवकरच जवानी जानेमन या सिनेमातून बॉलिवू़ड डेब्यू करणार आहे. या सिनेमात तिनं तब्बू आणि सैफ अली खान यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. अलाया सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलायानं एका मुलाखतीत बोलताना आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. आई वडिलांचा घटस्फोट आणि त्यांच्या आईचा नवीन ब्रॉयफ्रेंड तसेच वडिलांच्या दुसऱ्या पत्नी सोबत तिचं नातं कसं आहे हे सांगितलं आहे.

अलायाची आई अ‍ॅक्ट्रेस पूजा बेदीनं बिजनेसमन फरहान फर्निचरवालासोबत 1994 मध्ये लग्न केलं होतं. 2003 साली त्यांचा घटस्फोट झाला. या सगळ्यावर बोलताना अलाया म्हणाली, “माझे आई वडिल वेगळे झाले तेव्हा मी 5 वर्षांची होते. मला जास्त काही आठवत नाही. त्यानंतरचं मला जास्त आठवतं. माझं लहानपण आनंदात गेलं आहे. माझ्या आई वडिलांशी माझं रिलेशन चांगलं आहे. त्यांनी मला कधीच जाणीव नाही होऊ दिली की, आयुष्यात काही वाईट सुरू आहे. हा फक्त घटस्फोट आहे आणि असं होत असतं.”

पुढे बोलताना अलायानं सांगितलं की, तिचं आई पूजा बेदीचा नवीन बॉयफ्रेंड आणि तिच्या वडिलांसोबत तिचं नाव कसं आहे. पूजा बेदीचा नवीन बॉयफ्रेंड मानेक कॉन्ट्रॅक्टर आहे. तर तिचे वडिल फरहान यांनी फातिमासोबत दुसरं लग्न केलं आहे. अलाया म्हणाली, “माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आहे. त्यांना एक मुलगा आहे त्याचं नाव आहे जान. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. लोक म्हणतात की, तुझं तुझ्या सावत्र आईसोबत कसं जमतं. मला ती आवडते. मी असा कधीच विचार केला नाही. माझं मानेक कॉन्ट्रॅक्टरसोबतही चांगलं नातं आहे. सगळेच खूप चांगले आहेत. मी त्यांच्यासोबत नेहमीच खुश राहिले आहे.

पूजा बेदी एक प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस आहे. दिग्दर्शक आणि फिल्ममेकर कबीर बेदींची ती मुलगी आहे. 2011 मध्ये पूजा बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसली आहे.