अ‍ॅक्ट्रेस अलाया फर्निचरवालानं शोधली ‘ही’ नवीन योगा पोज ! म्हणाली – ‘3 मिनिटांचा संघर्ष’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लॉकडाऊनमध्ये योगा आणि एक्सरसाईजला घेऊन पुरी दुनिया वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. यात जवानी जानेमन फेम अ‍ॅक्ट्रेस अलाया फर्निचरवाला हिचाही समावेश आहे. पूजा बेदीची लाडकी अलाया सोशलवर खूप फेमस आहे. आता अलायानं नवीन योग पोज शोधून काढली आहे. याला तिनं नाव दिलं आहे 3 मिनिटांचा संघर्ष.

अलायानं काही व्हिडीओदेखील सोशलवर शेअर केले आहेत. अलाया लिहिते की, हे एखादं ट्युटोरियल नाहीये. खरं सांगायचं झालं तर मी आयुष्यात याआधी कधी योगा नाही केला. म्हणूनच 3 मिनिटं संघर्ष करताना दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये योगाची व्हिडीओ शोधून ट्राय करणं हे आवडीचं काम राहिलं आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट आवडत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करावे असं मी मानते. हे योगा त्याचीच झलक आहे. जर तुम्हाला याबद्दल जास्त माहिती नसेल तर याला घरी ट्राय करू नका.”

लॉकडाऊनमध्ये अलायानं अलायाएएफ ही इंस्टा सीरिज सुरू होती. यात ती आरोग्य, कला, ग्लॅमर आणि इतर अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसली. हे योगा व्हिडीओ त्याच सीरिजचा भाग होते.

अलायाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती जवानी जानेमन सिनेमात दिसली होती. 31 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अलाया सैफ अली खान आणि तब्बू प्रमुख भूमितकेत होते. अलायाचा हा डेब्यू सिनेमा होता.