पतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम पांडे’नं उघडली रहस्ये, म्हणाली – ‘माझे व्हिडिओ विकून…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे आजकाल आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. याच महिन्यात तिने आपला लॉंग टर्म बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केले, त्यानंतर ते दोघे हनीमूनला देखील गेले. त्याचबरोबर या लग्नाच्या काही दिवसानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूनम पांडेने तिच्या पतीवर मारहाण व अत्याचार केल्याचा आरोप केला आणि सॅम बॉम्बे यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर पूनम पांडेने आता या संपूर्ण प्रकरणात उघडपणे भाष्य केले आहे आणि या संभाषणादरम्यान तिने अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.

पूनम पांडेबद्दल बातम्यांमध्ये असे वृत्त आले होते की पूनमवर इतका अत्याचार झाला की तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्याचवेळी पूनम पांडेने स्पॉटबॉयशी बोलताना सांगितले की मी अजिबात ठीक नाही. माझ्या आयुष्यात काय घडत आहे हे कोणालाही माहिती नाही. गेल्या दीड वर्षापासून मी काय त्रास सहन करत आहे हे कोणालाही माहिती नाही. सर्व माझ्याबद्दल वाईट गोष्टी लिहिण्यात व्यस्त आहेत. मी एक अपमानकारक रिलेशनशिपमध्ये आहे. मला वाटले की लग्नानंतर सर्व काही ठीक होईल पण तसे झाले नाही. होय, त्याने माझ्यावर हात उगारला आणि मला मारहाण केली.

पूनमचे म्हणणे आहे की मी पोलिसांकडे गेले नव्हते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तेथील कर्मचार्‍यांनी खोलीतील आवाज ऐकून पोलिसांना बोलावले. ते आले आणि त्यांनी सर्व काही पाहिले, माझा चेहरा सुजला होता, माझ्या शरीरावर खुणा होत्या. सतत माझ्या बाबतीत जे घडत आहे त्याबद्दल मला खूप राग आला. यामुळे मी कायदेशीर कारवाई देखील केली.

संबंध संपवण्याच्या प्रश्नावर पूनम पांडे म्हणाली- या माणसाने माझे सर्व फोटो त्याच्या हँडलवरून डिलीट केले आहेत, परंतु अजूनही सर्वकाही ठीक होईल असा विचार करून मी केलेले नाहीत. तो नेहमीच असे करतो आणि मी स्वत:बद्दलचे लेख वाचून स्वत:च मूर्ख बनत राहते की मी त्याच्याकडून पैसे कमवत आहे परंतु हे खरे नाही. तो माझे व्हिडिओ विकून पैसे कमवत आहे. मी हे सर्व त्याच्या समोर बोलत आहे, तो माझ्या समोर बसलेला आहे.

तिने म्हटले की ती अजूनही गोव्यामध्ये आहे आणि पती सॅम बॉम्बेविरूद्ध केलेली तक्रार तिने मागे घेतली आहे. कारण तो माझ्यासमोर रडला आणि मला त्याबद्दल काय करावे हे खरोखर माहित नाही? प्रत्येक वेळी तो मला मारतो आणि नंतर रडून माफी मागतो. यावेळी त्याने वचन दिले होते की तो असे करणार नाही, परंतु पुन्हा तसेच घडले. त्याच्यामुळे मला ब्रेन हॅमरेज देखील झाला आहे. पूनमने सांगितले की यावेळी त्याने मला खूप मारहाण केली, हे हाफ मर्डरसारखे होते. मला माहित नाही की मी किती दिवस रुग्णालयात होते. पूनमने सांगितले की तिच्या कुटुंबियांनीही तिने सॅमबरोबर राहू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे परंतु ती सध्या काहीच समजण्याच्या अवस्थेत नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like