‘प्रभास – श्रद्धा’च्या ‘साहो’ मध्ये जैकलीनचा ‘आइटम साँग’

मुंबई : वृत्तसंस्था – नेटफ्लिक्सची चित्रपट ‘मिसेज सीरियल किलर’मध्ये मनोज बाजपेयी आणि मोहित रैनाची सोबत मिळाल्यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला आता बाहुबली स्टार प्रभासची सोबत मिळाली आहे. अभिनेत्री जॅकलिनने सरप्राइज आयटम डान्स पुढच्या चित्रपटासाठी जपून ठेवला आहे. आणि तो आता लीक झाला आहे.

 

https://www.instagram.com/p/ByZ1iSkndX2/

चित्रपट ‘रेस ३’ नंतर जॅकलिन कोणत्याच चित्रपट दिसली नाही. अभिनेत्री जॅकलिनचे २०१९ वर्ष खूपच धमाकेदार असणार आहे. सध्या जॅकलिन आपल्या डिजिटल डेब्यूची तयारी करत आहे. ती लॉस एंजेलिसला जाऊन इवाना चबक स्टूडिओमध्ये अभिनयाचा क्लास देखील घेत आहे. जॅकलिनचा उत्साह वाढतच आहे. तिचा उत्साह तिच्या बोलण्यामधून दिसत आहे.

श्रीलंका टुरीजमची ब्रॅंड ॲम्बेसेडर बनलेल्या जॅकलिनबद्दल अजून एका बातमीने हिंदी चित्रपटांमध्ये खळबळ उडाली आहे. जॅकलिनने प्रभासचा चित्रपट ‘साहो’साठी एक खास आयटम नंबर शूट केला आहे. यामध्ये जॅकलिन रॅप सिंगर बादशाहच्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

जॅकलिन मागील काही दिवसांपासून प्रयत्न करीत आहे की, ‘साहो’ चित्रपटामध्ये तिची झलक चाहत्यांसाठी एक सरप्राईज असावी. चित्रपट प्रदर्शित होण्याची जशी-जशी तारीख जवळ येत आहे तस-तसे चित्रपटाबद्दल एक-एक माहिती समोर येत आहे. जॅकलिनच्या जवळचे सांगतात की, या चित्रपटामध्ये जॅकलिनचा डान्स आत्तापर्यंतचा सगळ्यात सुंदर डान्स असणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना ती वेगळ्या अंदाजात दिसून येईल.

 

 

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

आगामी विधानसभेसाठी राजू शेट्टींचं ‘मिशन ४९

मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, कोणत्या विभागात किती पदे ?