प्रकाश जावडेकरांनी शेअर केला ‘एपीजे अब्दुल कलाम’ यांच्या बायोपिकचा ‘फर्स्ट’ लुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर आधारीत सिनेमाचा फर्स्ट लुक जारी केला आहे. एपीजे अब्दुल कलाम : द मिसाईल मॅन नावाचा हा सिनेमा हॉलिवूड आणि तेलगु उद्योगातील संयुक्त प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा 2020 च्या शेवटी रिलीज केला जाणार आहे. जावडेकरांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

प्रकाश जावेडकरांनी ट्विट केलं की, “आज दिल्लीत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला. हॉलिवूड आणि टॉलिवूडच्या संयुक्त प्रयत्नांनी साकारला जाणारा हा सिनेमा यावर्षाच्या शेवटी रिलीज केला जाणार आहे.

जगदीश दानेटी, सुवर्ण पप्पू आणि मार्टिनी फिल्म्सचे जॉनी मार्टिन यांच्या सहनिर्मितीत बनत असलेल्या या सिनेमात दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता अली प्रमुख भूमिकेत आहे.

जावेडकरांनी अशीही घोषणा केली की, अमेरिकेची मार्टिनी फिल्म्स आणि पिंक जगुआर एंटरटेन्मेंट यांच्यासोबत मिळून भारतात पाच सिनेमांच्या निर्मितीसाठी एक अबर अमेरिकन डॉलर अमेकिरन डॉलर गुंतवले जाणार आहेत.