First Look : ‘आदिपुरुष’नंतर प्रभासच्या आणखी एका सिनेमाची घोषणा ! K.G.F चे डायरेक्टर प्रशांत नीलच्या ‘या’ सिनेमात साकारणार भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बाहुबली (Baahubali) फेम प्रभास (Prabhas) गेल्या अनेक दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) या आगामी सिनेमामुळं चर्चेत आहे. अलीकडेच सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. आता केजीएफ (K.G.F) चे डायरेक्टर प्रशांत नील (Prashanth Neel) च्या आगामी सिनेमात प्रभास काम करणार आहे. आजच (बुधवार, दि. 2 डिसेंबर) या सिनेमाची घोषणा झाली आहे. सलार (SALAAR) असं या सिनेमाचं नाव आहे. होमेबल फिल्मनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सलार या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. पोस्टरमध्ये प्रभास खूपच इंटेस दिसत आहे. यात त्याचा खुंखार लुक दिसत आहे.

सलारचे डायरेक्टर प्रशांत नील यांनी असाही विश्वास दिला आहे की, प्रभासला लोकांनी अशा अवतारात कधीच पाहिलं नसेल. अद्याप तरी सलार सिनेमाच्या टीमनं पूर्ण कास्टचा खुलासा केलेला नाही. सिनेमाचं पोस्टर समोर आल्यानंतर आता चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तान्हाजी फेम ओम राऊतच्या आदिपुरुष या आगामी सिनेमात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. कृती सेनन यात सीतेची भूमिका साकारणार आहे. आता प्रभासकडे सलार हाही सिनेमा आहे.

You might also like