‘या’ ५ अभिनेत्री देखील ओढतात सिगारेट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – नुकतीच अभिनेत्री प्रियंका चोपडा तिच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आहे. या फोटोमध्ये प्रियंकाच्या हातात सिगरेट घेऊन दिसून येत आहे. तिच्यासोबत तिची आई आणि निकसुद्धा तिला सपोर्ट करत आहेत. प्रियंकाचा फोटो सोशल मिडियावर पडताच युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्रियंका चोपडा या कारणामुळे ट्रोल झाली कारण तिला अस्थमा आहे आणि ती अनेक वेळा सोशल मीडियावर स्मोकिंगच्या विरोधात कॅम्पिंन करत असते. पण ती स्वतः हा सिगरेट पितांना दिसली तर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली. प्रियंकाच नव्हे तर तिच्याआधी काही बॉलीवूड अॅक्ट्रेस देखील सिगरेट पितांनाचे फोटो टाकल्यामुळे ट्रोल झाल्या आहेत.
image.png
पाकिस्तानी अॅक्ट्रेस माहिरा खान, अभिनेता रणबीर कपूरसोबत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर स्मोकिंग करतांना दिसून आली होती. त्यांचे हे फोटो खूप व्हायरल झाले होते आणि त्यावेळी त्यांच्या अफेयरच्याही बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.
image.png
आपल्या फिटनेसमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री सुष्मिता चे देखील सिगरेट पितांनाचे फोटो समोर आले होते. सुष्मिता तिच्या या फोटोमुळे ट्रोल झाली आहे.
image.png
अभिनेत्री मनीषा कोइराला देखील पब्लिक प्लेसवर अनेकवेळा सिगरेट पितांना दिसून आली आहे. कॅन्सरच्या लढाईतून जिंकल्यानंतर तिने सिगरेट पिणे सोडून दिले.
image.png
द कपिल शर्मा शोमध्ये कपिल शर्माच्या पत्नी चा रोल निभावणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती देखील खुलेआम सिगरेट पितांना दिसून आली होती. सेटवर सिगरेट पितांनाचा फोटो देखील खूप व्हायरल झाला होता.
image.png
प्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेस सारा खान देखील सिगरेट पितांना स्पॉट झाली होती. हातात सिगरेट घेऊन तिचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
image.png
अभिनेत्री तनीषा मुखर्जीचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये तिचा हातात सिगरेटचे पॅकेट दिसते आहे. पण ती सिगरेट पितांना दिसून आली नव्हती.

आरोग्यविषयक वृत्त –