‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा इंस्टाग्रामवरील एका पोस्टने कमावते ‘इतके’ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा आता बॉलिवूडच्या मर्यादा तोडत ग्लोबल सेलेब्रिटी बनली आहे. प्रियंका सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. इंस्टाग्रामवर प्रियंकाने फोटो पोस्ट करायचा उशीर असतो की, तो सोशलवर प्रचंड व्हायरल होत असतो. प्रियंकासाठी सोशल मीडिया म्हणजे चाहत्यांशी संवाद साधण्याचं केवळ एक माध्यम नाहीये तर सोशल मीडियावरूनही प्रियंका कोटींची कमाई करते.

इंस्टाग्रामच्या शेड्युलिंग टूल Hopper HQ च्या यादीनुसार, प्रियंका चोपडा बॉलिवूडमधील अशी एकमेव अ‍ॅक्ट्रेस आहे जी या यादीत समाविष्ट आहे. प्रियंका या यादीत १९ व्या क्रमांकावर आहे. तर सेलेब्रिटी सब सेक्शनमध्ये ती १६ व्या क्रमांकावर आहे. या यादीनुसार, प्रियंकाचे ४ कोटी ३० लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. प्रियंका आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्याचे २ लाख ७१ हजार डॉलर म्हणजेच जवळपास १.८६ कोटी रुपये घेते. प्रियंका अनेक मोठ्या ब्रँड्सना इंस्टाग्रामवरून प्रमोट करते.

इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये कायली जेनर टॉपवर आहे. कायली जेनरचे इंस्टावर १३ कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत. प्रत्येक पोस्टला कायली १२ लाख ६६ हजार डॉलर म्हणजेच जवळपास ८.७३ कोटी रुपये चार्ज करते.

https://www.instagram.com/p/B0FOW6gndLo/?utm_source=ig_embed

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, द स्काय इज पिंक या सिनेमातून लवकरच ती सिनेमात परतणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुकही रिलीज करण्यात आला आहे. शोनाली बोस हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात जायरा वसीम आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. जय गंगाजल या सिनेमात प्रियंका शेवटची दिसली होती. हा सिनेमा प्रकाश झा यांनी डायरेक्ट केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –