…म्हणून ‘देसी गर्ल’ प्रियंकाला एका डॉक्टरनं विमानत दिली होती दुबईत अटक करण्याची ‘धमकी’ ! जाणून घ्या काय आहे प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडावर 2011 मध्ये एका हाय प्रोफाईल डॉक्टरसोबत गैरवर्तन करणं आणि दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांची खिल्ली उडवणं असे आरोप लागले होते. आरोप करणाऱ्या आणि ज्याच्यासोबत गैरवर्तन झालं त्या डॉक्टरचं नाव आहे डॉ फैयाज शॉल.

काश्मीरमध्ये जन्मलेले आणि अमिरेकत राहत असलेले हे डॉक्टर शॉल एक पारंपरिक हृदयरोगतज्ज्ञ होता. ब्रिटेनची महाराणी एलिजाबेथ आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ असे त्यांचे हाय प्रोफाईल पेशंट होते. 20 मे 2011 रोजी मुंबईवरून दुबईसाठी अमीरातचं उड्डाण झाल्यानंतर ते प्रवासात प्रियंकासोबत बसले होते. फैयाज यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये प्रियंकावर गैरवर्तणूक आणि शिवी दिल्याचा आरोप केला आहे.

फैयाज शॉल म्हणाले होते की, “एरवी मी दुबईल जाताना चार्टर्ड विमानातून जातो. परंतु हृदयाच्या आजाराची तपासणी करण्यासाठी दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांनी विनंती केल्यानं मला पाली हिलला त्यांच्या निवासस्थानी जावं लागलं. माझी फ्लाईट सुटल्यानं मी अमीरातच्या फ्लाईटमध्ये होतो. प्रिंयका प्रथम श्रेणीत माझ्यासोबत होती. तिनं आधीच विंडो सीट पकडली होती. विमान उड्डाण करतानाच ती फोनवर होती. कर्मचारीही काही बोलले नाही. कराण ते तिचे फॅन झाले होते. मी तिला रोखण्यासाठी एक नोट पास केली. फोन सिग्नलमुळं झालेल्या दोन एअर क्रॅश बद्दल माहिती होतं.”

शॉल पुढे म्हणतात, “यानंतर प्रियंका माझ्याकडे वळत म्हणाली, तू कोण आहेस मला अडवणारा. मी म्हणालो, जर तुम्ही अमेरिकेत असता तर तुम्हाला यासाठी अटक झाली असती. यात त्या म्हणाल्या फ** युएस. मी त्यांना म्हटलं की, डॉक्टर आहे आणि मुंबईत अनुभवी अॅक्टर दिलीप कुमार यांना बघतो. यावर त्या म्हणाल्या त्या म्हाताऱ्याचं कोणाला पडलंय. मी त्यांना म्हणालो की, तुम्ही माझं आणि इतर 250 चं जीवन धोक्यात घालत आहात, तुम्हाला असा कोणताही अधिकार नाही. मी त्यांना म्हटलं की, आपण जेव्हा दुबईत उतरू तेव्हा मी तुम्हाला यासाठी अटक करवू शकतो.”