… म्हणून दीराच्या लग्‍नात चक्‍क रडली अभिनेत्री प्रियंका चोप्रा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास लग्नाच्या बंधनामध्ये अडकला आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम सोफी टर्नर आणि अमेरिकेचा सिंगर जो जोनास यांनी फ्रान्समध्ये पुन्हा एकदा लग्न केले आहे. आपल्या दीराच्या लग्नामध्ये प्रियंकाचा लुक पाहण्यासारखा होता. लग्नामध्ये प्रियंकाने खूपच सुंदर पिंक कलरची साडी नेसली होती. साडीमध्ये प्रियंका खूपच छान दिसत होती. त्याचबरोबर निकसुद्धा सुंदर दिसत होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. नुकतेच जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्या लग्नाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या मस्त लग्नाच्या वातावरणात प्रियंकाचा एक फोटो चाहत्यांना चिंतेत टाकत आहे. या फोटोमध्ये चक्क प्रियंका रडताना दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल यात शंकाच नाही.

सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये प्रियंका चोप्रा आपले अश्रु पुसताना दिसत आहे. या फोटोत प्रियंका खूपच इमोशनल दिसत आहे. यामागे नक्की काय कारण असेल ? कदाचित प्रियंकाला तिचे स्वतःचे लग्न आठवले असेल. म्हणून ती भावनिक झाली असेल. लग्नामध्ये प्रियंकासोबत अमेरिकन सिंगर निक जोनस सुद्धा दिसत आहे. प्रियंकाच्या लग्नातील अनेक फोटोंनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रियंकाचा लग्नातील देसी लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याचबरोबर निकने ब्लॅक कलरचा टक्सीडो घातला आहे.

https://www.instagram.com/p/BzTe_aMBFN-/?utm_source=ig_embed

सोफी टर्नर आणि जो जोनस यांनी काही महिन्यांपुर्वी एक अवॉर्ड दरम्यान अचानक लग्न केले होते. यांच्या लग्नानंतर सगळे आश्चर्यचकीत झाले होते. नुकतेच त्यांनी विधी पद्धतीने लग्न केले आहे. त्यांनी विधी पद्धतीने २९ जूनला लग्न केले. लग्नाच्या दरम्यान पुर्ण जोनस परिवार एकत्र असतानाचा फोटोसुद्धा व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/BzTtc8JBA-m/?utm_source=ig_embed

 

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

जायरा वसीमच्या बॉलीवूड सोडण्याच्या निर्णयावर तसलीमा नसरिनने दिली प्रतिक्रिया

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड