‘देसी गर्ल’ प्रियंकानं पती निकसोबत 5 दिवसआधीच साजरी केली ‘होळी’, पार्टीत दिसली कॅटरीना कैफ

पोलीसनामा ऑनलाइन – होळी जवळ येत आहे तशी सर्वांना होळीच्या पार्ट्यांची प्रतिक्षा आहे. बॉलिवूड सेलब्रेटीही होळीला ग्रँड सेलिब्रेशन करत असतात. बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा होळी पर्यंत थांबू शकली नाही. तिनं पाच दिवस आधीच शानदार पार्टी केली आहे. या पार्टीत तिचा पती निक जोनासनं सर्वाधिक मस्ती केली. खास बात अशी की, निकनं होळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. निकनं स्वत: याबाबत खुलासा केला आहे.

निकनं होळी साजरी केल्यानंतर प्रियंका चोपडासोबत एक फोटो शेअर केला आहे. इंस्टावरून फोटो शेअर करताना निक म्हणतो, “माझी पहिली होळी. पाच दिवस आधीच. आपल्या दुसऱ्या घरी भारतात काही चांगल्या लोकांसोबत सेलिब्रेशन करताना किती मजा येत आहे.” या पार्टीत निक पूर्ण रंगीबेरंगी झाल्याचं दिसत आहे. त्यानं एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे की, म्युझिकमुळं या पार्टीला कशा प्रकारे चार चांद लागले आहेत.

केवळ निकच नाही तर प्रियंका चोपडा देखील पूर्णपणे सेलिब्रेशनच्या मुडमध्ये दिसून आली. तिनं निकसोबत अनेक फोटो क्लिक केले आहेत ज्यात ती रंग खेळताना दिसत आहेत. पार्टीत या दोघांव्यतिरीक्त इतरही अनेक पाहुणे दिसून आले. निकच्या फोटोत कॅटरीना कैफही दिसत आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे.