अभिनेत्री प्रियंका चोप्रा म्हणते, ‘पती’ आणि ‘बॉयफ्रेन्ड’मध्ये कमालीचा ‘फरक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड पासून हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख बनवणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांच्या लग्नाला जवळपास सात महिन झाले आहेत. 1 डिसेंबर 2018 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत हे त्यांचे सोशल मीडियावरील फोटो पाहिले तरी लक्षात येते. प्रियंका निक जोनसच्या परिवारात चांगलीच मिसळली आहे.

‘पती आणि बॉयफ्रेंड दोन्हीही खूप वेगळ्या गोष्टी आहेत’

नुकताच निक जोनसचा मोठा भाऊ जो जोनसचा आणि सोफी टर्नरचा विवाह झाला. या लग्नावेळी प्रियंका खूपच भावू झाल्याचे दिसून आले. या सगळ्या भावना प्रियंकासाठी नक्कीच वेगळ्या आहेत. एका मुलाखतीत बोलताना निक सोबत लग्न केल्यानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबाबत बोलताना प्रियंका म्हणाली की, “पती आणि बॉयफ्रेंड दोन्हीही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही शपथा घेता, तेव्हा असं वाटू लागतं की, ती व्यक्ति माझा परिवार आहे आणि त्या परिवाराला मी निवडलं आहे. त्याच्या प्रति एक जबाबदारी बनून जाते. सुरक्षेचीही जाणीव होते. आम्ही एकमेकांबाबत रोज शिकत असतं.”

‘ती जाणीव एकदम बरोबर होती’

प्रियंकाने आपल्या लग्नाच्या आठवणी ताज्या करत म्हटले की, “ती खूप असामान्य वेळ होती. मी आणि निकने ऑक्टोबरमध्ये लग्नाची जागा फिक्स केली आणि 1 डिसेंबर रोजी आम्ही लग्नबंधनात अडकलो. आमच्याकडे लग्नासाठी केवळ दीड महिन्याचा वेळ होता. ती वेळ माझ्यासाठी खूपच वेगळी होती. मी असं मानते की, लग्न एकदाच होतं, अशात ती जाणीव एकदम बरोबर होती.”

 

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय