पाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट कमेंट, पुढं झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या घोषणेनंतरच पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे. केवळ नेतेच नाही तर कलाकार आणि सामान्य लोकही सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहे. आता एका पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्याने प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांच्या लूकविषयी अत्यंत वाईट कमेंट केल्या आहेत.

वकार जका नावाच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये हा व्यक्ती पाकिस्तानी पंतप्रधानांना देशातील भारतीय कलाकारांची बिलबोर्ड हटवा, अशी मागणी करत आहे. यासोबतच तो म्हणत आहे की, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ते पाकिस्तानमध्ये व्यवसाय करीत आहेत, परंतु प्रसिद्धीसाठी भारतीय कलाकारांचा वापर करतात. त्या व्यक्तीने प्रियांका आणि दीपिकावर पाकिस्तानी आणि भारतीय अभिनेत्रींची तुलना केली आणि असे म्हणले आहे की, त्याने दीपिकाला दुबईमध्ये समोरासमोर पाहिले आहे तेव्हा त्याला उलटी होता होता राहिली. अशीच प्रियंकाबद्दल देखील त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक पाकिस्तानी मुलीने तिला विचारले की, तिने भारत-पाकिस्तान तणावाच्या वेळी आपल्या स्टेटसवर जय हिंद लिहिले होते. युनेस्कोची अ‍ॅम्बेसेडर असल्याच्या नात्याने हे बरोबर आहे का ? प्रियंकाने त्या मुलीला दिलेले प्रत्युत्तरही व्हायरल झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –