बॉलिवूडचं सेक्स रॅकेट ‘कनेक्शन’, मॅनेजर अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील सेक्स रॅकेट उघड झाले आहे. देहविक्रय रॅकेट चालवणाऱ्या बॉलिवूडमधील एका प्रॉडक्शन मॅनेजरला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. हे रॅकेट जुहू येथील एका तारांकित हॉटेलमध्ये चालवले जात होते अशी माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली. झेड लक्झरी रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकून या देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश केला गेला.

समाजिक सेवा शाखेकडून या सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला आणि बॉलिवूडमध्ये निर्मिती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या राजेश कुमार लाल या इसमाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणीची माहिती मिळाल्यानतंर पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून या रॅकेटचा पर्दाफाश केला. या रॅकेटमधून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. आता या प्रकरणातील उझबेकिस्तानहून तरुणी पाठवणाऱ्या महिलेचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 23 डिसेंबर 2019 ला पोलिसांनी देह विक्रय रॅकेट प्रकरणी तीन महिलांची सुटका केली. उझबेकिस्तानची रहिवासी असलेल्या त्या महिलेचे नाव झरिना असून ही महिला राजेश कुमार लाल याच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

मागील महिन्यात कुलाबा येथे देखील एक असेच सेक्स रॅकेट समोर आले होते. हे सेक्स रॅकेट ऑनलाइन चालवले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली होती. त्याआधी प्रभादेवीच्या परिसरात देखील एका स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेले सेक्स रॅकेट उघड झाले होते. यात पोलिसांनी 9 महिलांची सुटका केली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !