सुशांत सुसाईड केस : गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ‘सूचक’ वक्तव्य, म्हणाले – ‘बॉलीवूडमधील वैमनस्याच्या अँगलनेही होणार तपास’

मुंबई : बॉलीवुड अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर सोमवारी मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो 34 वर्षांचा होता. दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

अनिल देशमुख म्हणाले, अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमधून ही गोष्ट समोर आली आहे की, त्याने आत्महत्या केली. मीडियाद्वारे अशा गोष्टी समोर येत आहेत की, फिल्म इंडस्ट्रीमधील बिझनेस रायवलरीमुळे त्याने आत्महत्या केली आहे, याचासुद्धा तपास पोलीस करतील.

कंगना राणावत म्हणाली – सुसाईड नाही, प्लान मर्डर

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलीवुडमधील जीवनसंघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून फिल्म इंडस्ट्रीवर कंगना राणावतने संताप व्यक्त केला आहे. कंगनाने त्या सर्व लोकांवर जोरदार हल्ला केला आहे, जे सुशांतची आत्महत्या हे डरपोकपणाचे लक्षण असल्याचे म्हणत आहेत. ज्यांनी सुशांतच्या आत्महत्येला नशेशी जोडण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांवर कंगनाने जोरदार प्रहार केला आहे. कंगनाच्या टीमकडून ट्विटरवर टाकण्यात आलेल्या एका व्हिडिओत कंगनाने फिल्म इंडस्ट्रीतील लोकांवर निशाणा साधताना म्हटले आहे की, ही आत्महत्या नाही, तर एक प्लान मर्डर आहे.

मीरा चोपडाने फिल्म इंडस्ट्रीला म्हटले क्रूर आणि निर्दयी

तर, प्रियंका चोपडाची बहिण मीरा चोपडाने सुद्धा बॉलीवुडवर प्रहार केला आहे. मीरा चोपडाने फेसबुक पोस्ट लिहून बॉलीवुडच्या लोकांवर निशाणा साधला आहे. तिने म्हटले की, आम्ही अशा एका इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत, जी क्रूर, थंड आणि निर्दयी आहे. आम्हाला सर्वांना माहित आहे, सुशांत मोठ्या कालावधीपासून अस्वस्थ होता, परंतु कुणीही मदत का केली नाही? त्याचे मित्र, जवळचे लोक, ते दिग्दर्शक आणि निर्माता कुठे आहेत, ज्यांच्यासोबत त्याने काम केले होते. का कुणी आले नाही, आणि मदत केली नाही. त्याला प्रेम का दिले नाही, त्याला हवे तसे काम दिले गेले नाही. कारण कुणाला त्याची पर्वा नव्हती. मला हे बोलल्या बद्दल माफ करा, पण कुणाला काहीही फरक पडत नाही, तुमच्या सोबत काय होत आहे.