‘मलंग’पुर्वी बनलेल्या ‘या’ 6 रोमँटीक थ्रिलरनी घातलाय ‘धुमाकूळ’, ‘हे’ सुपरस्टार्स बनलेत ‘किलर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये सायकॉलॉजिकल थ्रिलर मुव्हीज दीर्घकाळापासून बनत आहेत. या जॉनरचे सिनेमे नेहमीच रोमांचित करणारे राहिले आहेत. दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांचा मलंग सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. मलंग व्यतिरीक्त बॉलिवूमध्ये सायकॉलॉजिकल आणि रोमँटीक थ्रिलर दोन्ही जॉनरचे अनेक सिनेमे आहेत. याच सिनेमांची यादी आपण पाहणार आहोत.

1) डर (1993)-
यश चोपडा दिग्दर्शित डर एक जबरदस्त सायकॉलॉजिकल प्लस थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात दाखवलं आहे की, शाहरुख खान, जुही चावलासाठी खूप पागल झाला आहे. तो तिला मिळवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो. प्रेम मिळवण्यासाठी लोकांना मारणंही त्याला योग्य वाटतं असंच काहीसं या सिनेमात दाखवलं आहे.

dar

2) दिल से (1998) –
शाहरुख खान आणि मनीषा कोयराला स्टारर दिल से हा सिनेमा नॉर्थ ईस्ट इंडिया मध्ये झालेल्या गोंधळाच्या बॅकड्रॉपवर बनवण्यात आला आहे. यातील एक पत्रकार ज्या महिलेच्या प्रेमात असतो जी खूप वेगळी असते. ती अनेक गोष्टींबद्दल रहस्यमय असते.
dil se

3) डार्लिंग (2007) –
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या हॉरर थ्रीलर सिनेमात आदित्य नावाच्या माणसाची स्टोरी दाखवण्यात आली आहे. आदित्यचं आपल्या सेक्रेटरी गीता सोबत अफेअर असतं. तिचा स्वभावही खूप विचित्र असतो. त्याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगाही असतो. तो आधी गीताला वचन देतो की तो पत्नीला घटस्फोट देईन परंतु तो नंतर पलटी खातो.
darling

4) बाजीगर (1993) –
हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री आहे. शाहरुख प्रेमाचं नाटक करत शिल्पा शेट्टीचा खून करतो. या मर्डरला लपवण्यासाठी त्याला अनेक खोटं बोलावं लागतं आणि तो अनेकांना मारतो.
bajigar
5) गुप्त (1997) –
तीन लोकांचा हा सिनेमा एका मर्डरभोवती फिरताना दिसतो. मर्डरच्या आरोपात बॉबी देओलला अटक केली जाते. परंतु खरा खुनी कुणी दुसराच असतो. बॉबीचं प्रेम जिंकण्यासाठी काजोल हे सगळं करत असते. जेणेकरून बॉबीचं प्रेम असणारी मनीषा कोयराला त्याच्यापासून दूर राहिल.
gupt
6) नो स्मोकिंग (2007) –
अनुराग कश्यप दिग्दर्शित नो स्मोकिंग एका अशा माणसाची स्टोरी आहे जो आपलं लग्न वाचवण्यासाठी सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतो. यासाठी तो बाबा बंगालीकडे जातो. यावेळी त्याला अनेक नको असणाऱ्या घटनांना सामोरं जावं लागतं.
no smoking