‘बिग बी’ अमिताभला चुकून जखमी केल्यानंतर ‘या’ अभिनेत्यासोबत झालं होतं ‘असं’ काही ! स्वत:च केला खुलासा

आज कुली सिनेमातील तो किस्सा जाणून घेणार आहोत ज्याची शुटींग करताना बिग बी अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यांचं वाचणंही मुश्किल झालं होतं. अनेक महिने त्यांनी यासाठी उपचार घेतले होते. परंतु ज्या अभिनेत्यामुळं अमिताभ जमखी झाले होते त्याच्याही जीवनावर याचा परिणाम झाला. त्यालाही 7-8 सिनेमे गमवावे लागले होत. या अभिनेत्याचं नाव आहे पुनित इस्सर. हा किस्सा घडला होता 26 जुलै 1982 रोजी, मनमोहन देसाई डायरेक्टेड कुली सिनेमातील एक अॅक्शन सीन करताना. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत पुनीत इस्सर यांनी यावर भाष्य केलं आहे.

बिग बींनी हाताळली होती परिस्थिती

हाच किस्सा सांगताना पुनीत इस्सर म्हणाले, “कुली सिनेमातील एक अॅक्शन सीन करताना फायनल टेक घेताना आमचा टायमिंग मॅच नाही झाला आणि मी चुकून अमिताभ यांना जखमी केलं. तरीही ते माझ्यासोबत प्रेमानंच वागत होते. मी त्यांना भेटायला गेल्यावर ते म्हणाले होते की, तुला कसं वाटत आहे हे मी समजू शकतो. कारण एका सिनेमात मीदेखील चुकून विनोद खन्नाला जखमी केलं होतं. यात त्यांच्या डोक्याला 8 टाके पडले होते.”

‘मला सोडायला गेटवर आले’

पुनीत इस्सर पुढे म्हणाले, “त्यांनी माझी अडचण तर समजू घेतलीच, सोबतच जगासमोरही हे सिद्ध केलं की, आमच्या दोघांमध्ये सारं काही आलबेल आहे. ते मला सोडायला गेटवर आले, जेणेकरून जगाला समजावं की, आमच्यात कसलाही राग किंवा रुसवा नाही. माझ्या पत्नीनं त्यांच्यासाठी ब्लडही डोनेट केलं.”

‘गमवावे लागले 7-8 सिनेमे’

पुनीत यांनी सांगितलं की, “या घटनेनंतर मला 7-8 सिनेमे गमवावे लागले. जोपर्यंत मला महाभारत मालिका मिळाली नाही तोपर्यंत मी अडचणीत होतो.” पुनीत यांनी महाभारतमध्ये दुर्योधनाचा रोल साकारला होता.