सुशांत सुसाईड केस : ‘…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन’ – कंगना रणौत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिनं मुव्ही माफियांद्दल युद्ध छेडलं होतं. व्हिडीओ शेअर करत तिनं अनेक खुलासे केले होते. बॉलिवूडमधील बडे लोक स्टार किड्स आणि बाहेरून आलेल्या लोकांसोबत भेदभाव करतात असं सांगत तिनं नेपोटीजमवरही भाष्य केलं होतं. गटबाजीवरही ती अनेकदा बोलली आहे. पुन्हा एकदा तिनं काही खुलासे करत बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. इतकंच नाही तर तिनं असंही म्हटलं आहे की, तिनं बोललेली विधानं जर ती सिद्ध करू शकली नाही तर ती तिचा पद्मश्री पुरस्कारही परत द्यायला तयार आहे.

‘…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन’

एका मुलाखतीत बोलताना कंगना म्हणाली, “मला मुंबई पोलिसांनी बोलावलं होतं. परंतु तेव्हा मी मनालीमध्ये होते. त्यामुळं माझा जबाब रेकॉर्ड करण्यासाठी कोणाला पाठवू शकत असाल तर पाठवा अशी विनंती मी त्यांना केली. परंतु यानंतर मला काहीच उत्तर मिळालं नाही. जर मी असं काहीही म्हणाले असेल ज्याची मी साक्ष देऊ शकत नाही किंवा मी ते सिद्ध करू शकत नाही जे की पब्लिक डोमेनमध्ये नाहीये तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन.” कंगनानं याआधीही अनेक व्हिडीओ शेअर करत प्रकरणी धक्कादायक खुलासे केले आहेत.

पुढे बोलताना कंगना म्हणते, “मी असं नाही म्हणत की, कोणाची अशी इच्छा होती की, सुशांतनं मरावं. परंतु त्यांना हे पहायचं होतं की, अभिनेत्यानं स्वत:लाच लिंच करावं. महेश भट परवीन बाबीच्या आजारांची अनेक माध्यमातून विक्री करत आहेत. मुंबई पोलीस आदित्य चोपडा, महेश भट, करण जोहर आणि राजीव मसंद यांना चौकशीसाठी का बोलवत नाहीत ? ते शक्तीशाली आहेत म्हणून ?” असा सवालही तिनं केला आहे.