‘लगान’ सिनेमातील ‘या’ 62 वर्षीय अभिनेत्याला पत्नीनं मागितला घटस्फोट, मागितली 10 कोटींची पोटगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पीपली लाईव आणि लगान यांसारख्या सिनेमात काम करणारे दिग्गज अभिनेता 62 वर्षीय रघुवीर यादव यांच्या पत्नीनं घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. रघुवीर यांची पत्नी पौर्णिमा खर्गा यांनी मुंबईच्या बांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पौर्णिमा आणि रघुवीर गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे रहात आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता रघुवीरवर पौर्णिमानं व्याभिचाराचे आरोप लावले आहेत. तिनं 1 लाख रुपयांचा इंटर्म मेंटेनन्स आणि 10 कोटी रुपयांची पोटगी मागितली आहे.

रघुवीर आणि पौर्णिमा यांना एक मुलगा आहे. 30 वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत राहतो. पौर्णिमानं याचिकेत म्हटलं आहे की, रघुवीरनं धोका दिला आहे. त्यांचे विवाहबाह्य संबंध आहेत. पौर्णिमा आंतरराष्ट्रीय कथ्थक डान्सर आहे. प्रसिद्ध कथ्थक डान्सर बिरजू महाराज यांच्या शिष्या आहे. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा येथे शिकत असताना पौर्णिमा आणि रघुवीर यांची भेट झाली. तेव्हा ते स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर होते. दोघांनी मध्य प्रदेशातील रघुवीरच्या गावात लग्न केलं होतं.

याआधी 1995 मध्ये खुद्द रघुवीर यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पौर्णिमा यांनी आपल्या अर्जात सांगितलं की, त्यांना 1995 मध्ये संशय आला होता की, पतीचे आपल्या कोस्टार सोबत संबंध आहेत. त्यांनी लग्न वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. रघुवीर यांनी जबलपूर मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. काही वर्षांनी त्यांनी आपला अर्ज परत घेतला.

रघुवीर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर डायरेक्टर प्रकाश झा यांच्या मुंगेरीलाल के हसीन सपने या टीव्ही शोमधून त्यांना ओळख मिळाली होती. 80 दशकात हा शो टेलिकास्ट केला जायचा.

You might also like