जीन्स घातल्यामुळं ट्रोल झाली ‘ही’ 69 वर्षीय अ‍ॅक्ट्रेस ! ट्रोलर्सलाही दिलं जोरदार ‘प्रत्युत्तर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अ‍ॅक्ट्रेस रजनी चांडी (Rajini Chandy) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिनं केलेलं नवं फोटोशुट आहे. परंतु 69 वर्षीय रजनीचा हा अवतार अनेकांना आवडला नाही म्हणून त्यांनी रजनीला चक्क ट्रोल केलं. रजनीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे तिच्या नव्या फोटोशुटमधील फोटो आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं जिन्स घातली आहे. परंतु या जिन्स घालण्यावरून अनेकांनी ट्रोल केलं आहे. काहींनी तर यासाठी नाराजीही व्यक्त केली आहे.

फोटोत दिसत आहे की, रजनीनं टॉर्न जीन्स, व्हाईट टॉप आणि डेनिम जॅकेट घातलं आहे. या लुकमध्ये रजनीचा काही वेगळाच अंदाज दिसत आहे. कारण आतापर्यंत चाहत्यांनी तिला फक्त ट्रॅडिशनल वेअरमध्ये पाहिलं होतं.

हेच कारण आहे रजनीनं जीन्स घालणं काहींना पचलं नाही. यामुळं ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. असं असलं तरी काहींनी तिचं या लुकसाठी कौतकही केलं आहे. इतकंच नाही तर ट्रोल करणाऱ्या लोकांना रजनीनं प्रत्युत्तर देखील आहे.

रजनीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींना तिचा हा बदलेला लुक आवडलाही आहे.