Man Vs Wild : PM मोदी यांच्यानंतर शोमध्ये दिसणार सुपरस्टार रजनीकांत, ‘इथं’ होणार शुटिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित केलेला शो ‘Man vs Wild’ टेलीव्हिजनवर लोकप्रिय शोपैकी एक आहे. शोमध्ये त्याचे होस्ट बेयर ग्रिल्सला लोक खूप पसंत करतात. अलीकडेच हा शो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देखील चर्चेत आला होता, कारण पंतप्रधान मोदींनी या शोमध्ये भाग घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, या शोमध्ये भारताचा सुपरस्टार रजनीकांत भाग घेणार आहेत. आता रजनीकांतही बेयर ग्रिल्ससोबत जंगलामध्ये फिरताना आणि अ‍ॅडव्हेंचर लाइफ एन्जॉय करताना दिसणार आहे. असे सांगितले जात आहे की रजनीकांत लवकरच या शोचे शूटिंग करणार असून रजनीकांत कर्नाटकातील बांदीपूर टायगर रिझर्व्ह येथे या शोचे शूटिंग करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शोची शूटिंग उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट पार्क येथे झाली होती. शो खूप लोकांनी पाहिला होता, तेथे पीएम मोदी यांनी बेयर ग्रिल्ससोबत जंगलात वेळ घालवला होता आणि त्यासोबत खूप चर्चाही केली होती. यावेळी, नरेंद्र मोदींनी जलयुक्त जीवनाचा आनंद लुटला होता.

रजनीकांत यांच्याबद्दल बोलायचे म्हणले तर ते ‘दरबार’ या चित्रपटात दिसले आहे. सुपरस्टार्स त्यांच्या चित्रपटांसह चाहत्यांमधील पसंतीमुळे ओळखले जातात, कारण त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांचे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आदल्या रात्री चित्रपटगृहात पोहचतात. त्यांनी दक्षिण भारतीय भाषांसह हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या शोच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा