अभिनेत्री राखी सावंतची दीपक कलालला धमकी ; म्हणाली , ‘तुझा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेहमीच चर्चेत आणि वादात राहणारी अभिनेत्री राखी सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतरही ती पुन्हा वादात सापडताना दिसत आहे. दीपक कलालला घेऊन ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आधी दीपकने ४ कोटी रुपये परत मागत राखीला धमकी दिली होती. यानंतर त्याने तिच्या पतीवरही वाईट शब्दात कमेंट केली. यानंतर यामुळे राखी सावंत मात्र खूपच भडकली आहे.

दीपकने शेअर केलेल्या एका व्हिडीओत तो म्हणत आहे की, “मला असं कळलं आहे की तो (राखीचा नवरा रितेश) हि*** आहे. मला काही नाही हे तुझं आयुष्य आहे. पंरतु तुझं जे मोठं स्वप्नं आहे १२ मुलांची क्रिकेट टीम बनवण्याचं ते रितेशसोबत कधीच पूर्ण होणार आहे. तू रितेशला सोडून दे.”

दीपकचा हा व्हिडीओ त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. राखीनेही हाच त्याचा व्हिडीओ शेअर करत त्याला शिव्या देण्यासाठी चाहत्यांना अपील केलं आहे. यानंतर राखीनेही एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती दीपक कलालला अश्लील शब्दात बोलत आहे. खालच्या शब्दात जाऊन त्याचा समाचार घेत आहे.

एका राखी व्हिडीओत म्हणत आहे की, “मी एक पतीव्रता आहे. तू कोणत्याही पाताळात जाऊन लप. मी तुला शोधून काढेन दीपक कलाल. तू माझं काली, दुर्गाचं रूप पाहिलं नाहीस. मी दुर्गा बनूव त्रिशुळाने तुझा वध करेल. आता तू बघ मी तुझा बँड वाजवते.”

२०१८ साली राखी सावंतने दीपकसोबत लग्न करण्याची घोषणा केली होती. परंतु नंतर मात्र तिनेच हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगितले होते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like