बॉलिवूडमधील ‘हे’ 11 कपल कधी झाले ‘भाऊ-बहिण’ तर कधी केला ऑनस्क्रिन ‘रोमँस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रक्षाबंधनाचा सण भावा-बहिणीसाठी खास सण असतो. यावर्षी 15 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण आला आहे. बॉलिवूडमध्येही भावा-बहिणीच्या नात्याला चागंल्या प्रकारे दाखवलं जातं. काही अ‍ॅकटर्स असे आहेत, जे पडद्यावर एकमेकांचे भाऊ बहिण तर बनले आहेतच परंतु त्यांनी आणखी दुसऱ्या सिनेमात रोमँसही केला आहे. अशा 11 जोड्यांची आपण माहिती घेणार आहे.

image.png

1) रणवीर सिंग- प्रियंका चोपडा-
2014 साली आलेल्या गुंडे या सिनेमात प्रियंका चोपडाने रणवीर सिंगच्या काळजात प्रेमाची घंटी वाजवली होती. परंतु दिल धडकने दो या सिनेमात मात्र रणवीर आणि प्रियंका भावा बहिणीच्या रोलमध्ये दिसले. यानंतर पुन्हा बाजीराव मस्तानी या सिनेमात प्रियंकाने रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
image.png

2) अर्जुन रामपाल- दीपिका पादुकोण-
2007 मध्ये आलेल्या दीपिका पादुकोणचा डेब्यू सिनेमा ओम शांति ओम मध्ये अर्जुन रामपालने तिच्या लव्हरचा रोल साकारला होता. तर 2010 साली आलेल्या हाऊसफुल या सिनेमात अर्जुन दीपिकाचा बिग ब्रदर बनला होता. या सिनेमात दीपिकासोबत अक्षय कुमार दिसला होता.
image.png

3) जॉन अब्राहम-दीपिका पादुकोण-
जॉन अब्राहमनेही दीपिका पादुकोणसोबत दुहेरी नातं निभावलं आहे. 2011 साली आलेल्या देसी बाईज या सिनेमात जॉन आणि दीपिका रोमँस करताना दिसले तर 2013 साली आलेल्या रेस 2 या सिनेमात दीपिका जॉनच्या बहिणीच्या भूमिकेत होती.
image.png

4) अभिषेक बच्चन- असिन
2012 साली आलेल्या बोल बच्चन या सिनेमात अभिषेक बच्चनने असिनच्या भावाची भूमिका साकारली होती. तर 2015 साली आलेल्या ऑल इज वेल मध्ये अभिषेक आणि असिन ऑनस्क्रिन रोमँस करताना दिसले होते.
image.png

5) तूषार कपूर- करीना कपूर-
तूषार कपूरने 2001 मध्ये आलेल्या मुझे कुछ कहना है या सिनेमातून डेब्यू केला होता. करीना कपूर यावेळी लिडींग लेडीच्या रोलमध्ये होती. यानंतर 7 वर्षांनी गोलमाल रिटर्न्स मध्ये तुषार बेबो करीनाच्या भावाच्या भूमिकेत दिसला. यात अजय देवगन हिरो होता.
image.png

6) शाहरुख खान-ऐश्वर्या रॉय
2002 साली आलेल्या जोश या सिनेमात शाहरुख आणि ऐश्वर्या बहिण भावाच्या रोलमध्ये होते. या सिनेमात शाहरुख सोबत प्रिया गिल होती. याशिवाय अ‍ॅशसोबत चंद्रचूड सिंह होता. यानंतर दोन वर्षांनी देवदास सिनेमात शाहरुख खानने अ‍ॅशसोबत पडद्यावर रोमँस केला.
image.png
7) सलमान खान-नीलम
1992 साली आलेला सलमान खानचा सिनेमा एक लडका एक लडकी मध्ये त्याच्यासोबत नीलम होती. यानंतर सात वर्षांनी आलेल्या 1999 मधील हम साथ साथ है या सिनेमात नीलम सलमानची बहिण म्हणून पडद्यावर दिसली.
image.png

8) अमिताभ बच्चन-हेमा मालिनी
हेमा मालिनी आणि बिग बी अमताभ बच्चन यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेकदा ऑनस्क्रीन रोमँस केला आहे. परंतु 1973 साली आलेल्या गहरी चाल या सिनेमात बिग बी हेमा मालिनीच्या भावाच्या रोलमध्ये दिसले होते.
image.png

9) अमिताभ बच्चन-सायरा बानो
70च्या दशकातील सुंदर अभिनेत्री सायरा बानोसोबतही अमिताभ यांनी भावाचं आणि प्रियकराचं नातं निभावालं आहे. 1975 साली आलेल्या जमीर या सिनेमात सायरा बानो आणि अमिताभ यांनी सिब्लिंग्सचा रोल साकारला होता. तर 1976 साली आलेल्या हेराफेरी या सिनेमात सायरा या अमिताभच्या लिडींग लेडी होत्या.
image.png

10) देव आनंद-जीनत अमान
1971 साली आलेल्या हरे रामा हरे कृष्णा मध्ये देव आनंद जीनम अमान सारख्या अल्ट्रा ग्लॅमरस अॅक्ट्रेसचे भाऊ बनले होते. यानंतर दोन वर्षांनी 1973 मध्ये आलेल्या हीरा पन्ना या सिनेमात देव आनंद यांनी जीनम अमान सोबत पडद्यावर रोमँस केला होता.
image.png

11) धर्मेंद्र-मीना कुमारी
धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांचं नातंही असंच आहे. 1965 आलेल्या काजल या सिनेमात धर्मेंद्र यांनी मीना कुमारी यांच्या भावाचा रोल केला होता. यानंतर एका वर्षांने आलेल्या फूल और पत्थर या सिनेमात याशिवाय इतरही अनेक सिनेमात दोघांनी रोमँस केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त