अभिनेत्री रकुल प्रीतनं शेअर केला फोटो, चाहते म्हणाले – ‘पाण्यात आग लावलीस’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दे दे प्यार दे या सिनेमात दिसलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आज एक मोठी स्टार आहे. रकुल प्रीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत नेहमीच ती आपले फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं बिकनीतल्या एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता. तिनं याआधीही अनेक बिकनीतील फोटो शेअर केले होते. यातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत ज्यामुळं रकुल चर्चेत आली आहे. सध्या तिचा बोल्ड बिकीनी अवतार चर्चेत आहे.

रकुलचा एक फोटो तर एवढा व्हायरल झाला आहे की त्याला 8 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊसच पाडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या लुकचं आणि स्माईलचं कौतुक केलं आहे. फोटो शेअर करताना रकुलनं लिहिलं की, हसल्या शिवाय गेलेला कोणताही दिवस वाया गेल्यासारखा आहे. तिच्या फोटोवर कमेंट करताना तिच्याच अंदाजात एकानं म्हटलं की, तुझं गाणं ऐकल्याशिवाय गेलेला दिवसही वाया गेल्या सारखा आहे. एकानं तिला म्हटलं की पाण्यात आग लावलीस. एकानं तर तिला आय लव यू म्हटलं.

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रकुल लवकरच इंडियन 2 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कमल हासनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतही एका सिनेमात काम करताना दिसेल.