Ghani First Look : राम चरणनं शेअर केलं सिनेमाचं फर्स्ट लुक मोशन पोस्टर ! ‘असा’ दिसला वरुण तेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ स्टार वरुण तेज (Varun Tej) च्या 31 व्या वाढदिवसानिमित्त राम चरण (Ram Charan) नं वरुणच्या 10 व्या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. Ghani असं या सिनेमाचं नाव आहे. सिनेमात वरुण तेज बॉक्सरच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिनेमा फुल पॅक्ड ॲक्शन ड्रामा असेल. वरुण तेज तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील ॲक्टर आणि फेमस प्रोड्युसर नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. राम चरण आणि अल्लू अर्जुन हे त्याचे कजिन आहेत.

राम चरणनं त्याच्या ट्विटरवरून सिनेमांच एक मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या सोबत त्यानं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. याशिवाय त्यानं सिनेमाच्या टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत.

खास बात अशी की, या सिनेमात मराठी ॲक्टर, डायेरक्टर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची लेक आणि सलमान खान (Salman Khan) ची दबंग 3 मधील हिरोईन सई मांजरेकर (Saiee Manjrekar) ही प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी (Sunil Shetty)हाही झळकणार आहे. हा सिनेमा जून 2021 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आधी हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार होता. परंतु नंतर ही रिलीज डेट चेंज करण्यात आली.

वरुणच्या वर्कफ्रटंबद्दल बोलायचं झालं तर वयाच्या 10 व्या वर्षापासून तो बालकलाकार म्हणून काम करत आहे. वडिलांच्या हँड्सअप या सिनेमातून त्यानं बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. 2014 मध्ये त्यानं मुकुंदा सिनेमातून ॲक्टींगमध्ये खरं पाऊल टाकलं. या सिनेमात त्याच्या सोबत पूजा हेगडे दिसली होती. गद्दालाकोंडा गणेश या सिनेमात तो अखेरचा दिसला होता. यात त्यानं 40 वर्षीय गँगस्टरची भूमिका साकारली होती.