…म्हणून दिग्दर्शक राम गोपाल वर्माला पोलिसांना करायचे KISS

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – निर्माता- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या चित्रपटांपेक्षा विवादांमुळे नेहमी चर्चेत असतो. नुकताच राम गोपाल वर्माने दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘स्मार्ट शंकर’ बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला आहे. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी राम गोपालने अनोखे कारनामे केले. ते तीनजण गाडीवर बसून सिनेमाघरात पोहचले आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याचा हा कारनामा बघून पोलिसांनी त्याला दंड ठोठावला आणि या गोष्टीवर राम गोपाल वर्माने ट्विट केले त्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हे ट्विट हैद्राबाद पोलिसांसाठी आहे.

https://twitter.com/RGVzoomin/status/1152534222315253760

राम गोपाल वर्माने आपल्या व्हॅरिफाइड ट्विटर हॅन्डलवर ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणारा व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडीओ शेयर करत त्याने लिहिले की, ‘कहां है ट्रैफिक पुलिस, लगता है सभी थिएटर के अंदर हैं और फिल्म ‘स्मार्ट शंकर’ देख रहे हैं.’ रामगोपाल वर्माच्या या ट्विटवर सायबर ट्रॅफिकने प्रतिक्रिया देत त्याच्यावर १३३५ रुपयांचा दंड ठोठावला आणि लिहिले की, ‘ट्रैफिक नियमों के उल्लंघन की रिपोर्ट करने के लिए शुक्रिया राम गोपाल वर्मा. हम उम्मीद करते हैं कि आप ट्रैफिक नियमों का खुद ही पालन करेंगे. वैसे सिर्फ सिनेमाघरों में क्यों? ट्रैफिक पुलिस ऐसा (रामगोपाल वर्मा वीडियो) ड्रामा हर रोज सड़कों पर देखती है.’

https://twitter.com/CYBTRAFFIC/status/1152570757139947520

सायबर ट्रॅफिकच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत राम गोपाल वर्माने लिहिले की, ‘गारू, I love you और मैं तुम्हें किस करना चाहता हूं. लगातार 39 दिन तक शानदार काम के लिए. अगर मेरी दूसरी बेटी होती तो मैं आपको अपना दामाद बना लेता.’ तसेच राम गोपाल वर्माने डोक्यावर वाईन टाकतांनाचा एक व्हिडीओ शेयर केला होता. त्या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये लिहिले होते की, ‘मैं पागल नहीं हूं लेकिन स्मार्ट शंकर की कामयाबी ने मुझे पागल बना दिया है.’
https://twitter.com/RGVzoomin/status/1152618636873363456

आरोग्यविषयक वृत्त –