‘रणबीर-आलिया’च्या लग्नासाठी ऋषि – नीतू कपूर यांनी केली मोठी तयारी, 2020 पुर्वी होणार ‘हे’ काम

नवी दिल्ली वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये सध्या ज्या लग्नाची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचे लग्न. या दोन सुपरस्टार्सच्या लग्नाची वाट चाहते खूप दिवस पाहत होते. यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रणबीरचे आई-वडील म्हणजेच ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी या दोघांच्या लग्नासाठी खास तयारी केली आहे. जी 2020 मध्ये सगळ्यांच्या समोर येईलच.

आलिया-रणबीर यांना लग्नाबद्दल विचारले असता ते यावर उत्तर देत नाही. पण आता असे दिसत आहे की, ते 2020 मध्ये लग्न करतील. त्याचबरोबर यापूर्वी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना एक खास काम पूर्ण करायचं आहे. स्पॉटबॉयजच्या मते, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना कृष्णराज प्रॉपर्टीचा एक भाग ताबडतोब बांधायचा आहे. जेणेकरून घरात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची पूजा आयोजित केली जाऊ शकेल. नीतूने आर्किटेक्टला हिवाळा संपण्याच्या आत 2020 पर्यंत तळघरचे बांधकाम पूर्ण करण्यास सांगितले आहे. यासह रणबीर-आलियाच्या लग्नानंतर कृष्णराजाच्या बंगल्यावर ही पूजा केली जाऊ शकते.

ही सूचना त्यांच्या गुरुजींनी कपूर कुटुंबाला दिली आहे आणि नीतू कपूर आपल्या गुरुजींच्या सर्व गोष्टी पाळतात. 1980 मध्ये ऋषी आणि नीतू यांनी पाली हिलवर कृष्णराज बंगला विकत घेतला होता, ज्यामध्ये ते रणबीर आणि रिद्धिमासोबत 35 वर्षांपासून राहत आहे. आता कपूर कुटुंबाला हा बंगला तोडून 15 मजली उंच इमारत बांधायची आहे. त्यासाठी पालिकेची परवानगीही मागविण्यात आली आहे. येथे आलिया-रणबीरच्या लग्नाची पूजा केली जाईल.

आलिया-रणबीरच्या लग्नाबद्दल बरीच वर्षे कित्येक कयास सुरू आहेत. दोघांच्या बनावट लग्नाच्या फोटोंवरुन बनावट कार्डही व्हायरल झाले आहे. आत्तापर्यंत आलिया-रणबीर किंवा कपूर कुटुंबीयांपैकी कोणत्याच व्यक्तीने या लग्नाशी संबंधित कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आता हे पहायचे आहे की हे दोघे 2020 मध्ये लग्न करतील की नाही ?

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !