नीतू कपूरनं कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस, सेलिब्रेशनमध्ये दिसला करण जोहर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर हिनं पहिल्यांदाच ऋषी शिवाय आपला वाढदिवस साजरा केला आहे. नीतूनं नुकताच (बुधवार दि 8 जुलै 2020) आपला वाढदिवस साजरा केला आहे. हा नीतूचा 62 वा वाढदिवस होता. मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धीमा कपूर यांनी हा वाढदिवस खास बनवण्यात कोणतीच कसूर सोडली नाही. नीतूचा वाढदिवस शानदार अंदाजात पार पडला. नीतूनं बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.

नीतूनं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले हे वाढदिवस साजरा करतानाचे हे फोटो आहेत. कॅप्शनमध्ये नीतू म्हणते, “श्रीमंत ते आहेत ज्यांच्याकडे चांगले नाते आहेत. आपण सर्वांनी आपल्या नाकतेवाईकांशी आणि प्रियजनांशी प्रेमानं रहायल हवं. मला आज खूप श्रीमंत असल्यासारखं वाटत आहे.”

नीतूनं शेअर केलेल्या फोटोत फिल्ममेकर करण जोहर आणि अगस्त्य नंदा हेदेखील दिसत आहेत. नीतू आपल्या कुटुंबासोबत दिसत आहे. रणबीर आपल्या आईला हग करताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केली आहे. आलिया भट फोटोत दिसत नसल्यां अनेकांनी सवाल केले आहेत. सध्या नीतूच्या बर्थडे सेलिब्रेशनचे हे फोटो सोशलवर झपाट्यां व्हायरल होत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like