‘ब्रह्मास्त्र’साठी बनारसला गेलेल्या रणबीर कपूरचं नरेंद्र मोदींबद्दल मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या आपला आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच ते या सिनेमाच्या शुटींगसाठी बनारसला गेले आहेत. त्यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना बनारसमधील आपला अनुभव शेअर केला आहे. विशेष म्हणजे रणबीर कूपरने बनारसच्या कायापलटाबाबत मोदींचे कौतुक केल्याचे दिसून आले.

मीडियाा रिपोर्ट्सनुसार, रणबीरने बनारसचा कायापालट पाहिल्यानंतर मोदींची स्तुती करत म्हटले की, “बनारस खूपच बदललं आहे. येथील अस्वच्छता खूपच कमी झाली आहे. गंगादेखील स्वच्छ झाल्याचे दिसत आहे. या सगळ्याचं क्रेडिट मोदींना द्यायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी माझ्या हृदयात खूप प्रेम आणि आदर आहे. लोकांमधे त्यांच्याविषयी जे प्रेम आणि लगाव आहे ते मुंबईमध्ये बसून कधीच समजणार नाही.”

यासोबतच रणबीरसोबत असणाऱ्या त्याच्या अॅक्ट्रेसनेही आपला बनारसमधील अनुभव शेअर केला आहे. आलिया म्हणाली की, “आम्हाला येथील जीवपद्धती आणि इतर परंपरा तसेच येथील कल्चरसोबत स्वत: जोडले गेल्याचे जाणवत आहे. या सिनेमात रणबीर आणि आलिया यांच्या व्यतिरीक्त साऊथ सुपरस्टार नागर्जुन आणि मौनी रॉय हे कलाकार देखील दिसणार आहेत.

असे समजत आहे की, ब्रह्मास्त्र हा सिनेमा करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या सर्वात महाग सिनेमांमध्ये समाविष्ट होणार आहे. बॉलिवूडमध्ये असे पहिल्यांदाच होणार आहे की, हा सिनेमा तीन भागात(Trilogy) रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या आधी इतर लोकांनीच प्रेक्षकांच्या आशा वाढवल्या आहेत. हा सिनेमा एक अॅक्शन अॅडवेंचर सिनेमा असणार आहे.

सिनेजगत

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

You might also like