अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘त्या’ वक्तव्यावर रंगोली चंदेलची प्रतिक्रिया, म्हणाली- ‘करण जोहर इफेक्ट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री नेहा धुपिया आपल्या एमटीव्ही रोडीजमधील वक्तव्यामुळं चर्चेचा विषय बनताना दिसत आहे. काही लोक सोशल मीडियावर तिचं समर्थन करत आहेत तर काही लोक तिला विरोध करत टीकाही करत आहेत. शनिवारी तिनं या प्रकरणी स्पष्टीकरणही दिलं होतं. यानंतर तिचं समर्थन करत तापसी पन्नू पुढे आली आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1239083813944213504

हे प्रकरण थंड होण्याआधीच आता कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेलनं यात उडी घेतली आहे. नेहाच्या वक्तव्याला तिनं करण जोहर इफेक्ट म्हटलं आहे. रंगोलीनं ट्विट करत म्हटलं की, जर नेहाला वाटत असेल तर की, नात्यात कोणत्या सहमती शिवाय किंवा एकमेकांविषयी माहितीनं 5 पुरुषांना डेट करणं ठिक आहे आणि आणि एखाद्या महिलेनं पुरुषांचा शारीरिक छळ करणं बरोबर आहे तर हा करण जोहरच्या बेस्ट फ्रेंडचा(नेहा) साईट इफेक्ट आहे.” रंगोलीनं नेहाला स्वयंघोषित स्त्रीवादीही म्हटलं आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1239081323416805376

नेमकं काय घडलं ?
रोडीजच्या ऑडिशनदरम्यान स्पर्धकाला अपशब्द वापरल्यानंतर अभिनेत्री नेहा धुपिया सोशल मीडियावर टीकेची धनी होताना दिसली होती. नॅशनल टीव्हीवर शिवीगाळ केल्यानं तिच्यावर टीका झाली होती. रोडीजच्या ऑडिशनदरम्यान आपलं नियंत्रण हरवल्यानं नेहानं मुलीला कानाखाली लगावल्यासंदर्भात एका मुलाला सुनावलं होतं. यानंतर ती सोशलवर ट्रोल होऊ लागली होती.

https://twitter.com/Rangoli_A/status/1239080531947442176