राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 2’ चित्रपटाला कोटा रहिवास्यांचा विरोध, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीचा आगामी चित्रपट ‘मर्दानी 2’ राजस्थानातील कोटा शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कोटाच्या लोकांनी शुक्रवारी लोकसभेचे सभापती आणि कोटाचे खासदार ओम बिर्ला यांना राणी मुखर्जीच्या आगामी ‘मर्दानी 2’ चित्रपटाचा निषेध नोंदवण्यासाठी सांगितले.

कोटा शहराचे लोक म्हणाले की, कोटा शहराची ओळख शिक्षणाचे केंद्र म्हणून कायम आहे, आजूबाजूच्या क्षेत्रात अनेक शैक्षणिक केंद्रे आहेत. चित्रपटामध्ये कोटा शहराबद्दल एक वेगळीच गोष्ट सांगितली गेली आहे जी शहराच्या वारसाविरूद्ध आहे. गुरुवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोटामध्ये एक सीरियल बलात्कारी आणि किलरला दाखविले आहे. जो तिथे शिकण्यासाठी आलेल्या तरुण मुलींना निशाणा बवनितो. चित्रपटात हा ही उल्लेख केला आहे की, हा चित्रपट सत्य घटनावर आधारित आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘संबंधित लोकांशी या विषयावर चर्चा केली जाईल. सिनेमाच्या माध्यमातून शहराचे नाव बदनाम करणे मान्य नाही. काल्पनिक कथेमध्ये शहराचे नाव स्पष्टपणे नमूद करणे योग्य नाही. ‘मर्दानी २’ या चित्रपटात राणी मुखर्जी ही शिवानी शिवाजी रॉय या महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत.’

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ती महिला पोलिस अधिकारी दोन दिवसांत सिरियल रेपिस्टला पकडण्यासाठी शपथ घेताना दिसत आहे. गुरुवारी ट्रेलर रिलीज होताच कोटाचे नाव चित्रपटातून काढून टाकण्याच्या मागणीसाठी कोटाचे लोक चित्रपटाच्या निषेधार्थ बाहेर आले. ‘मर्दानी 2’ चे शूट कोटामध्ये झाले आहे. शूटसाठी राणी मुखर्जी कित्येक दिवस शहरात होती. यश राज प्रॉडक्शनने ‘मर्दानी 2’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !