‘महबूबा-महबूबा’ गाण्यावर मुलीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसले अभिनेते रंजीत ! पुढं झालं ‘असं’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक अभिनेते रंजीत सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असतात. रंजीत यांचा मुलगी दिव्यांका हिच्यासोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होत आहे. रंजीत चक्क मुलीसोबत थिकरताना दिसत आहे.

रंजीत यांनी त्यांच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते त्यांची मुलगी दिव्यांका सोबत शानदार डान्स मुव्स करताना दिसत आहेत. रंजीत शोले सिनेमातील महबूबा महबूबा या गाण्यावर मुलीसोबत तिच्या डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. खास बात अशी की, चाहत्यांनाही बापलेकीचा हा डान्स खूप आवडला आहे.

व्हिडीओ शेअर करताना रंजीतनं खास कॅप्शनही दिलं आहे. व्हिडीओ शेअर ते म्हणतात, “जवळपास 80 वर्षे. या वयात फक्त मुलगीच माझ्याकडून डान्स करवून घेऊ शकते.”

अनेकांनी यावर कमेंट केली आहे. एकानं म्हटलं की, मुलगी तर भल्या भल्यां नाचवते. एकानं म्हटलं, सर तुम्ही तर गोळीहून जास्त वेगवान आहात. याशिवाय इतरही चाहते आहेत जे कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like