स्टार बनताच रानू मंडलचा ‘स्वभाव’ बदलला, महिलेनं स्पर्श केल्यानं ‘खवळल्या’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रानू मंडलचे नाव तर तुम्हाला माहितच असेल काही महिन्यांपुर्वी रेल्वे स्थानकावर गाणे गाणाऱ्या रानू यांच्या एका व्हिडिओने इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवून दिली होती. लोकांना रानू यांचा व्हिडिओ इतका आवडला की हिमेश रेशमियाच्या माध्यमातून त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधीही मिळाली. यानंतर, रानू यांच्या प्रत्येक व्हिडिओ आणि गाण्याला लोकांकडून प्रचंड पाठबळ आणि प्रेम मिळालं. रानू जेव्हा लोकांसमोर आल्या तेव्हा अगदी विनम्रतेने बोलल्या. आता रानू यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हे पाहून असे दिसते की स्टार बनल्यानंतर रानू यांच्यामध्ये बरेच बदल झाले आहेत.

रानू यांचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणत्याही गाण्याचा नाही तर रानू यांना भेटायला आलेल्या त्यांच्या एका महिला चाहत्याचा आहे. या व्हिडिओमध्ये रानू सुपर मार्केटमध्ये वस्तू खरेदी करताना दिसत आहे. दरम्यान, मागून एका बाईने येऊन रानू यांच्या हातावर हात ठेवला आणि सेल्फी घेण्यास सांगितले. यावर राणू यांना राग आला आणि त्यांनी त्या महिलेला दूर राहण्यास सांगितले आणि म्हणाल्या की, स्पर्श करण्याचा अर्थ काय आहे. रानू यांना महिलाने स्पर्श केलेले आवडले नाही त्या खूप भडकल्या आहे.

रानू यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते खूप नाराज झाले आहे. सर्वजण त्यांच्या या वागणुकीवर चिडले आहे. त्याचबरोबर अनेक लोक म्हणतात की स्टार बनल्यानंतर रानू यांची वृत्ती बदलली आहे. रानू यांना सल्ला देताना काही लोकांनी असेही म्हटले आहे की, एखाद्याने यशाबद्दल कधीही बढाई मारु नये, अन्यथा खाली येण्यास वेळ लागत नाही. त्याचवेळी, काही लोकांनी रानूला स्पर्श करणार्‍या महिलेच्या वागणुकीला पसंत केले नाही.

रानू यांच्याबद्दल बोलायचे म्हणले तर स्टार बनण्यापूर्वी, रानू मंडल पश्चिम बंगालच्या रानाघाटमधील रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकांवर गाणी गात असे आणि त्याऐवजी त्यांना मिळालेल्या वस्तूने त्यांचे पोट भरत असे. अतींद्र चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीने रानू यांचा व्हिडिओ बनवला आणि फेसबुकवर शेअर केला, ज्यामध्ये त्या लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे म्हणत होत्या. फक्त या व्हिडिओने त्यांना एका रात्रीत स्टार बनविले. हिमेश रेशमियाच्या ‘हॅपी हार्डी और हीर’ या चित्रपटात त्यांनी आता तीन गाणी गायली आहेत.

Visit : Policenama.com