Brahmastra : ‘दीपिका-रणवीर’ला ऑफर झाला होता रणबीर कपूरच्या आई-वडिलांचा रोल ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रणबीर कूपर आणि आलिया भट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते वाट पहात आहेत. अलीकडेच सिनेमाची रिलीज डेट समोर आली होती. अशात आता सिनेमाबद्दल नवीन माहीती समोर आली आहे. या सिनेमासाठी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनाही विचारण्यात आलं होतं. अयान मुखर्जी रणवीर सिंग आणि दीपिकाला रणबीर कपूरचे आई-वडिल बनवणार होता.

दीप-वीरची शॉर्ट एन्ट्री ?
एका इंग्रजी वृत्तानुसार, डायरेक्टर अयानला या पौराणिक सायन्स फिक्शन सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणला घ्यायचं होतं. त्याला यंग जनरेशनचे दोन अ‍ॅक्टर्स हवे होते जे रणबीर कपूरचा रोल ‘शिवा’चे आई-वडिल बनू शकतील. पहिल्या भागात त्यांची काही वेळ एन्ट्री होती. नंतर कॅरेक्टर उदयास येणार होतं. अशी माहिती आहे की, रणवीर आणि दीपिका कमी वयात आई-वडिल झाल्याचं दाखवण्यात येणार होतं. परंतु त्यांनी या रोलसाठी नकार दिल्याचं समजत आहे.

आलिया-रणबीरचा एकत्र पहिलाच सिनेमा
रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमादरम्यान दोघांमध्ये जवळीकता वाढताना दिसत आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, मौनी रॉय हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

View this post on Instagram

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

You might also like