Video : केवळ ‘त्या’ महिलेसाठी रणवीर सिंहने केला बेडवर उभे राहून ‘विनोदी’ डान्स

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा किंग रणवीर सिंह नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेमध्ये असतो. कधी आपल्या ड्रेसिंग सेंसमुळे तर कधी आपल्या अभिनयामुळे. अशामध्ये पुन्हा एकदा रणवीर सिंह चर्चेमध्ये आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होताना दिसत आहे. रणवीर सिंहचा एक ब्लॅक अँड व्हाइट व्हिडिओ सोशल मिडियाच्या समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने हॅपी बर्थडे टू यू गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये रणवीर सिंह ‘हम भी अगर बच्चे होते..’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका हॉटेलमधला आहे. ज्यामध्ये रणवीर बेडवर विनोदी डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये रणवीरने गॉगल आणि ओवरकोट घातला आहे. रणवीर एकदम बिंदास डान्स करुन धमाल करताना दिसत आहे.

रणवीरचा हा व्हिडिओ शानू शर्माने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. रणवीरने खास शानूला बर्थडे विश करण्यााठी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ शेअर करुन शानूने एक पोस्ट लिहली आहे. पोस्टमध्ये तिने रणवीर वरचे प्रेम व्यक्त केले आहे.

शानू शर्मा यशराज फिल्ममध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे. तिचे बॉलिवूडमधील अनेक कलाकार चागंले फ्रेंड आहेत. बर्थडेला शानूला अनेक कलाकारांनी विश केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी

जाणून घ्या – मूत्रपिंड विकाराची लक्षणे

पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय

मनशांतीसाठी सहज करता येतील ‘हे’ सोपे आणि घरगुती उपाय