Photo : रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण म्हातारे झाल्यावर दिसणार ‘असे’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत दोघेही म्हातारे दिसत आहे. हा कोणत्याही सिनेमाचा लुक नाही, तर चाहत्यांनीच बनवलेला एक फोटो आहे. या फोटोद्वारे एका चाहत्याने हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, जेव्हा रणवीर आणि दीपिका ८० वर्षांचे होतील तेव्हा ते कसे दिसतील.

image.png

रणवीर आणि दीपिकाचा हा फोटो ओल्ड एज फिल्टर लावून बनवण्यात आला आहे. या फोटोत दोघेही म्हातारे दिसत असून दोघांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत. दोघांचे केसही पांढरे दिसत आहेत. परंतु खास बात अशी की, दोघेही या लुकमध्ये स्मार्ट दिसत आहेत. रणवीरची सफेद दाढी त्याला खूप सुट करत आहे. परंतु दीपिकाचा चेहरा थोडा नकली वाटत आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लग्नानंतर दोघेही ८३ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारीत असणार आहे. या सिनेमात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत आहे. दीपिका लिजेंड्री क्रिकेटर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. १० एप्रिल २०२० रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

८३ व्यतिरीक्त दीपिका पादुकोण मेघना गुलजारच्या ‘छपाक’ सिनेमातही दिसणार आहे. अ‍ॅसिड अटॅक सर्व्हाईवरच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेसी लिड रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाची शुटींग जवळपास पूर्ण झाली आहे. १० जानेवारी २०२० रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

 

Loading...
You might also like