#Video : पाऊस पाहून रवीना झाली ‘रोमँटीक’, टिप टिप बरसा पाणी म्हणत सोशलवर लावली ‘आग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाऊस म्हटलं की सर्वांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. नुकताच मुंबईत धुवाधार पाऊस झाला. सर्वजण जुन्या आठवणीत रमताना स्टार्सही मागे नसतात. अभिनेत्री रवीना टंडनही आपल्या जुन्या आठवणीत रमल्याचे दिसत आहे. पाऊसाशी तिचंही जुनं नातं आहे. याच पाऊसावर रवीनाचं टिप टिप बसरा पानी हे हिट गाणं शुट केलं होतं.

मुंबईत पाऊस झाल्यानंतर रवीनाही याच गाण्यात वाहून गेली. तिने एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, रवीना टिप टिप बरसा पानी या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. तिने खऱ्या गाण्यात आहे तशीच पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. तिला डान्स करताना पाहून रणबीर कपूर बघतच रहात आहे. जेव्हा रवीनाचा परफॉर्मंस संपतो तेव्हा रणबीर तिला फ्लाईंग किस देतानाही दिसत आहे. जेव्हा तुम्हा हा व्हिडीओ पहाल तेव्हा तुम्हीसुद्ध रवीनाच्या सादरीकरणाचं कौतुक कराल.

 

 

रवीनाने छोट्या पडद्यावरील रियलिटी शो सबसे बडा कलाकार या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये हा डान्स परफॉर्मंस केला होता. मोहरा सिनेमातील हे गाणं इतकं फेमस आहे की, पाऊस पाहिला तर केवळ रवीनालाच नाही तर सर्वांनाच हे गाणं आठवतं. काही दिवसांपूर्वी रवीना सोनी चॅनलवरील सुपर डांसर या शोमध्ये आली होती. त्यावेळी त्यातील अमरदीप आणि गौरवच्या जोडीने तिच्यासाठी टिप टिप बरसा पानी गाण्यावर सादरीकरण केले होते. या गाण्यावरील गौरवचा रोबोटीक डान्स रवीनाला इतका आवडला होता की, तिने याचा पूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.

 

रवीनाचं म्हणणं होतं की, अशा गाण्यावर असा परफॉर्मंस तिने कधीच पाहिला नव्हता. तिला देखील असा डान्स ट्राय करायचा आहे. म्हणूनच तिने पूर्ण डान्स रेकॉर्ड करून घेतला.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी
स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!
पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा
डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

 

 

Loading...
You might also like