‘तोंड’ लपवून रेल्वेमधील सीट ‘साफ’ करताना दिसली अभिनेत्री रवीना टंडन (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आपल्या एका व्हिडीओमुळं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. रवीनी तोंडाला मास्क लावून ट्रेनमधून प्रवास करताना दिसली. यावेळी तिनं असं काही काम केलं जे तिनं क्वचितच केलं असेल.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, रवीना टंडन ट्रेनचं सीट साफ करत आहे. रवीनानं तिच्या इंस्टावरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिनं सांगितलं की, ट्रेन सुरू होण्याआधी आपल्या केविनला ओल्या वाईप्स आणि सॅनिटायजरनं साफ केल्यानंतर आपण अधिक कंफर्टेबल होऊन जातो. सॉरीपेक्षा सुरक्षित राहिलेलं चांगलं आहे.

रवीनाचा हा व्हिडीओ तसा तर जुना आहे. परंतु व्हिडीओच्या माध्यमातून कोरोनापासून तिनं सुरक्षित राहण्याचा संदेश दिला आहे. रवीनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी तर मोठ्या संख्येत यावर लाईक करत कमेंट केली आहे. रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपलं मत कायमच ती सोशल मीडियावरून मांडत असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं रवीना कायमच चर्चेत असते.

https://www.instagram.com/p/B9OioyuFiyn/

https://www.instagram.com/p/B8gzEadg39I/

https://www.instagram.com/p/B8f5jogn_J2/