अभिनेत्री रेखाप्रमाणेच सुंदर आहे तिची बहिण राधा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची एवरग्रीन अ‍ॅक्ट्रेस रेखा आजही कुठे दिसली तरी लोकांचं अटेंशन घेत असते. तुम्हाला माहिती आहे का की, दिसण्याच्या बाबतीत रेखाची लहान बहिण राधाही काही कमी नाही. नुकत्याच दोघी बहिणी एकत्र दिसल्या. रेखा राधासोबत एका इव्हेंटमध्ये आली होती. दोघींनी रॉयल अंदाजात एन्ट्री केली. दोघींची केमिस्ट्री पाहण्यसारखी होती.

रेखा बहिण राधासोबत एका आलिशान वेडिंग रिसेप्शनमध्ये आली होती. रेखाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं रेड साडी घातली होती. तर राधानं ग्रीन कलरची साडी घातली होती. या आउटफिटमध्ये दोघीही खूपच सुंदर दिसत होत्या. रेखा पूर्ण इव्हेंटमध्ये बहिण राधाचा हात पकडून तिच्यासोबत फिरताना दिसत होती. दोन्ही बहिणींनी केसात गजरा माळला होता. याआधीही दोघी बहिणी करीना आणि करिश्माचा भाऊ अरमान जैन आणि अनिसा मल्होत्रा यांच्या लग्नात आल्या होत्या.

रेखाप्रमाणे राधाही अ‍ॅक्ट्रेस होती. तिनं साऊथमधील अनेक सिनेमात काम केलं आहे. तिला या कामात खास असं यश मिळालं नाही. राधानं लग्नानंतर सिनेमात काम करणं बंद केलं. दीर्घकाळ रिलेशननंतर तिनं मॉडेल उस्मान सईद सोबत लग्न केलं. उस्मान लेखक आणि डायरेक्टर एस एम अब्बास यांचा मुलगा आहे. लग्नानंतर सर्वकाही सोडून राधा अमेरिकेत सेटल झाली.

रेखाही खूप काळापासून सिनेमांपासून दूर आहे. 80 च्या दशकातील ती फेमस अॅक्ट्रेस आहे. रेखा एका मोठ्या कुटुंबातून आली आहे. तिला 6 बहिणी आहेत. तिच्या बहिणीदेखील त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत. जया श्रीधर, नारायणी गणेशन, विजया चामुंडेश्वरी, रेवती स्वामीनाथन, राधा उस्मान सईद आणि कमला सेल्वराज अशी तिच्या बहिणींची नावे आहेत.