रिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्ड्समधून आमिर खानसह अनेक बॉलीवुड कलाकारांशी ‘बातचीत’ झाल्याचं आलं समोर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसमध्ये प्रत्येक दिवशी आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. सुशांतचे वडील केके सिंह यांनी जेव्हापासून रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे, तेव्हापासून या प्रकरणात मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय आणि ईडीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, रिया बॉलीवुडच्या अनेक सेलेब्रिटीजच्या संपर्कात होती. या सेलेब्समध्ये आमिर खान, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नावाचा सहभाग आहे.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये बॉलीवुड सेलेब्सची शांतता अगोदरपासून अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. तर आता रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्सची माहिती समोर आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. एबीपीच्या रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीची आमिर खान, श्रद्धा कपूर, आदित्य रॉय कपूरसह रकुल प्रीत, राणा दग्गुबाती आणि सनी सिंह सारख्या सेलेब्सशी चर्चा झाली आहे.

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आमिर खानला रियाने कॉल केला होता आणि आमिरने रियाशी तीन मॅसेजद्वारे संवाद साधला. या रिपोर्टवरून इंडस्ट्रीच्या इनसायडर्सने सांगितले की, रियाच्या कॉल डिटेल रेकॉर्डमधील नंबर आमिर खानचाच आहे. याशिवाय रियाने अक्ट्रेस रकुल प्रीतला 30 वेळा कॉल केला होता आणि रकुलने रियाला 14 वेळा कॉल केला होता. या दोघींचे मॅसेजद्वारे सुद्धा बोलणे झाले होते. आदित्य रॉय कपूरला रियाने 16 वेळा कॉल केला आहे आणि त्याने रियाला सातवेळा कॉल केला आहे.

तर श्रद्धा कपूरला रियाने तीन वेळा कॉल केला तर श्रद्धाने रियाला दोन वेळा फोन करून चर्चा केली. सोनू के टीटू की स्वीटी चा अभिनेता सनी सिंहला रियाने 7 वेळा कॉल केला आणि सनीने रियाला 4 वेळा कॉल केला. राणा दग्गुबातीशी रियाने 7 वेळा संपर्क साधला तर राणाने रियाला 4 वेळा कॉल केला.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रिया महेश भट्टच्या देखील संपर्कात होती. याच वर्षी जानेवारी महिन्यात दोघांमध्ये 16 कॉल्सद्वारे चर्चा झाली. रियाने महेश भट्टला 9 वेळा कॉल केला तर मेहश भट्टकडून रियाला 7 वेळा कॉल आला.

सध्या, रियाच्या चौकशीसह आणखी काही दृष्टीने तपास सुरू आहे. मागील दिवसात रियासह तिचा भाऊ शौविक, वडील इंद्रजीत, माजी मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी केली आहे. सुशांतचा हाऊस मॅनेजर, त्याचा सीए संदीप श्रीधर आणि बहिण मीतू सिंहचा जबाब सुद्धा नोंदवून घेण्यात आला आहे.