रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समध्ये खुलासा ! सुशांतची बहिण, वडिल अन् महेश भट्ट यांच्यासोबत झाली होती ‘बातचीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सुशांत सिंह राजपूत प्रकरण दररोज नवीन वळण समोर येत आहे. नुकतेच सुशांतच्या कॉल डिटेल्स समोर आले होते. आता रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्स समोर आल्या आहेत, ज्यामध्ये खुलासा झाला आहे की, तिचे 8 ते 14 जूनच्या दरम्यान महेश भट्ट, सुशांतचे वडील केके सिंह आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी सोबत बोलणे झाले होते.

रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेलमध्ये खुलासा झाला आहे की, तिचे सुशांतच्या वडीलांशी 18 मिनिट 12 सेकंद बोलणे झाले. भावाशी 17 मिनिट 49 सेकंद बोलणे, सुशांतशी केवळ 2 मिनिट 25 सेकंद बोलणे, श्रुती मोदीशी 13 मिनिट 28 सेकंद बोलणे, सॅम्युअल मिरांडाशी 4 मिनिट 49 सेकंद बोलणे आणि सिद्धार्थ पिठानीसोबत 1 मिनिट 40 सेकंद बोलणे झाले आहे.

हे पाहून स्पष्ट अंदाज लावला येऊ शकतो की, रिया आणि सुशांतमध्ये सर्वात कमी चर्चा झाली. तिचे आणि सुशांतचे 8 जूनला भांडण झाले होते, ज्यानंतर ती त्याचे घर सोडून गेली होती. यानंतर 14 जूनला सुशांतने फाशी लावून आत्महत्या केली होती.

दुसरीकडे रिया चक्रवर्ती आज ईडीच्या कार्यालयात पोहचली होती. तिला मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. सुशांतच्या वडीलांनी 25 जुलैला पाटणाच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात रिया आणि अन्य सहा लोकांच्या विरूद्ध तक्रार दाखल केली होती. अनेक गोष्टींसह सुशांतच्या कुटुंबाने रियावर त्याच्या बँक खात्यातून पैसे हडपल्याचा सुद्धा आरोप केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like