रिया चक्रवर्ती करतेय सुशांत सिंह राजपूतला Miss, अभिनेत्याच्या निधनाच्या 1 महिन्यानंतर केलं ‘हे’ काम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आज एक महिना झाला आहे. पोलीस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिनंही आतापर्यंत कोणतं स्टेटमेंट केलं नव्हतं किंवा सोशलवर कोणती पोस्ट शेअर केली नव्हती. सुशांत गेल्यानंतर आता एका महिन्यानंतर रियानं तिचा व्हॉट्स अॅपचा डीपी म्हणजे डिस्प्ले फोटो चेंज केला आहे.

रियानं व्हॉट्स अ‍ॅपला जो डीपी ठेवला आहे त्यात सुशांत आणि ती दिसत आहे. दोघंही स्माईल करताना दिसत आहेत. फोटो पाहून त्यांनी स्पेंड केलेल्या चांगल्या वेळेविषयी कल्पना येत आहे. दोघंह रोमँटीक मूडमध्ये दिसत आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात जवळपास 35 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा, सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी बॉलिवूड डायरेक्टर संजय लीली भन्साळी यांचीही चौकशी केली आहे.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं दि 14 जून 2020 (वार- रविवार) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता.