ऋचा चड्ढाच्या टी-शर्टवर डॉ. आंबेडकरांचा फोटो ! ट्रोल झाल्यानंतर दिलं ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढा (Richa Chadda) हिनं अलीकडेच एअरपोर्ट लुकवाला एक फोटो सोशलवर शेअर केला होता. तिच्या टीशर्टवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रिंट होती. तिचा असा टीशर्ट घालणं एका युजरला आवडलं नाही. त्यानं ऋचाला ट्रोल करणं सुरू केलं. ऋचानंही त्याला जशास तसं उत्तर दिलं.

ऋचाच्या पोस्टवर वाईट कमेंट करत कुश आंबेडकरवादी नावाच्या युजरनं लिहिलं की, तिनं दलित अ‍ॅक्टर्सला मेरिटलेस म्हटलं होतं. तिच्या आत ब्राह्मणवादाचं विष भरलं आहे.

या ट्रोलरला उत्तर देताना ऋचानं लिहिलं की, असं मी कधीच म्हटले नाही. हा लाजिरवाणा खोटेपणा आहे. आंबेडकर माझेही आयकॉन आहेत. त्यांचा टीशर्ट घालणं माझाही अधिकार आहे. आणि मी ब्राह्मण नाहीये हेही लक्षात असू द्या.

ऋचाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे.

ऋचाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आता लवकरच ती मॅडम चीफ मिनिस्टर या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती आर्टीकल 375 सिनेमात दिसली होती. याशिवाय तिनं डायरेक्टर अय्यर तिवारी यांचा स्पोर्ट ड्रामा सिनेमा पंगा मध्येही काम केलं आहे. तिचा शकीला हा सिनेमा 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे. 2008 मध्ये आलेल्या ओए लक्की, लक्की ओए या सिनेमातून ऋचानं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. ऋचानं गँग्स ऑफ वासेपूर च्या सीरिजमध्ये काम केलं आहे.