ऋषी कपूर यांचा अखरेचा सिनेमा ‘शर्माजी नमकीन’ याच वर्षी रिलीज होणार ! ‘हा’ अभिनेता पूर्ण करणार उर्वरीत शुटींग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिग्गज दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी कॅन्सरसोबत लढा देत जगाचा निरोप घेतला. परंतु चाहते त्यांना अखेरंच पडद्यावर पाहू शकणार आहेत. ऋषी कपूर यांचा अखेरचा सिनेमा शर्माजी नमकीन (Sharmaji Namkeen) याच वर्षी रिलीज होणार आहे. मेकर्सनी ठरवलं आहे की, हा सिनेमा त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी रिलीज केला जाणार आहे.

हा सिनेमा अनेक अंगानं अनोखा असणार आहे. ऋषी यांनीही सिनेमाची पूर्ण शुटींग केली नव्हती. अद्याप हा सिनेमा अधुराच आहे. आता परेश रावल यांनी सिनेमाची राहिलेली शुटींग ही त्याच भूमिकेत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे एक अनोखं पाऊल आहे. बहुतेक हिंदी सिनेमाच्या इतिहासातही असं पहिल्यांदाच होणार आहे. परेश रावल आणि निर्मात्यांनी ऋषी कपूर यांच्या सन्मानार्थ हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऋषी कपूर आणि परेश रावल यांची जोडी पटेल की पंजाबी शादी या सिनेमातही दिसली आहे.

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर द्वारा निर्मित शर्माजी नमकीन हा सिनेमा डेब्युटेंट हितेश भाटीयानं डायरेक्ट केला आहे. यात 60 वर्षांच्या एका व्यक्तीची स्टोरी दाखवण्यात आली आहे.