90 किलो होतं वजन, आता केले 6 पॅक ॲब्ज, पहा अभिनेत्याचं ‘शॉकिंग’ ट्रान्सफॉर्मेशन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेता रोहित रॉय सध्या आपल्या एका पोस्टमुळं जोरदार चर्चेत येताना दिसत आहे. अभिनेता रोहित आपल्या फिटनेस जर्नीमुळं चर्चेत आला आहे. रोहितनं एक पोस्ट सोशलवरून शेअर केली आहे ज्यात त्यानं आपल्या फिटनेस जर्नीबद्दल सांगितलं आहे.

रोहित रॉयनं इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यानं जुना आणि एक लेटेस्ट फोटो कोलाज करून शेअर केला आहे. यात त्याचा फॅट टू सिक्स पॅक ॲब्जवाला लुक दिसत आहे. रोहितची फॅट टू फिट जर्नी खरंच खूप प्रेकरणादायक आहे. रोहितनं फॅट टू फिट फोटो शेअर करत आपली जर्नी सांगितली आहे. आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहतनं लिहिलं की, “एवढंही वाईट नाही? परंतु हे लक्षात ठेवा की, ट्रान्सफॉर्म करणं एवढं सोपं नाही. आणि तो फिटनेस कायम ठेवणं अजूनच अवघड आहे. फिटनेस एक जर्नी आहे ध्येय नाही.”

रोहितच्या फिटनेस जर्नीनंतर चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. कोणी त्याला इंस्पायरींग म्हटलं आहे. त्याच्या या लेटेस्ट फोटोवर बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी, हिना खान, राहुल देव आणि आर महादेवन यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका मुलाखतीत रोहितनं सांगितलं होतं की त्याचं वजन 90 किलो झालं होतं. रोहितचं वय 51 वर्षे आहे. टीव्ही पासून तर बॉलिवूडमध्ये त्यानं आपली ओळख तयार केली आहे.

रोहितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर स्वाभिमान, देश में निकला होगा चांद यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. फॅशन, दस काहनियां, एक खिलाडी एक हसीना, शुटआऊट एट लोखंडवालाा यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

 

 

You might also like