माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दीवाने’च्या सेटवर कोरोनाचा ‘अटॅक’; 18 जणांना Corona ची लागण

मुंबई : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा बॉलिवूडलाही मोठा तडाखा बसला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या डान्स दीवाने ३ च्या सेटवरील तब्बल १८ जणांना कोरोना संसर्ग झाला असल्याचे आढळून आले आहे.

डान्स दीवाने ३ हा डान्स रिअ‍ॅलिटी शो आहे. यामध्ये माधुरी दीक्षित ही मुख्य परिक्षक आहे. धर्मेश येलांड आणि तुषार कालियासुद्धा यामध्ये जज्ज आहेत. डान्स दीवानेचा सेट गोरेगावमध्ये आहे.  शोच्या सेटवर १८ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाशी संबंधित सर्व जण घाबरले आहेत.

फेडरेशन  ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्राईस चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी सांगितले की, या शोमध्ये कास्ट आणि क्रूची आधी टेस्ट करुन घेतली जाते. त्यामुळे नव्या क्रुसाठी काही वेळ आहे. या शोचे पुढील शुटिंग ५ एप्रिलला होणार आहे. आणि पुन्हा एकदा प्री टेस्ट केले जाईल. ज्यांची टेस्ट निगेटिव्ह येईल, त्यांनाच सेटवर येण्याची परवानगी दिली जाईल. शिवाय आवश्यक ती खबरदारीही घेतली जाईल. जे काही झाले ते खूप दुदैवी आहे. कोरोना संक्रमित लोकांना लवकरात लवकर बरं वाटावे, अशी प्रार्थना आम्ही करतो, असे दुबे यांनी सांगितले.