Ajay Devgn नं सोशल मीडियाव्दारे केली आगामी चित्रपटाची घोषणा, नाव ऐकून तुम्हाला हसू आवरणारच नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JNN। बॉलिवूडमध्ये यावेळी लहान शहर आणि गावातील कथा गाजत आहेत. यापूर्वीही असे बरेच चित्रपट आले आहेत, ज्यांच्या गोष्टी हार्टलैंडमध्ये सांगितल्या होत्या आणि या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. आता बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगन यांनी अशाच एका चित्रपटाची घोषणा केली आहे.

शुक्रवारी अजय यांनी ट्विट करून सांगितले आहे की चित्रपटाचे शीर्षक ‘गोबर’ आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगन फिल्म्स आणि सिद्धार्थ रॉय कपूर फिल्म्स या दोघांनी मिळून केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सबल शेखावत करणार आहेत. अजय या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहेत, हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.

फिल्मची कथा उत्तर भारतात सेट होईल. ही कथा पशुवैद्याच्या आसपास फिरणारी आहे, जो स्थानिक रुग्णालयात चालणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभा राहतो. हा चित्रपट सामान्य माणसाच्या हिरोईजमला दाखवणारा आहे. अजय या दिवसात ऍक्टिंगसोबत चित्रपट निर्मिती करण्याच्या कामात सक्रिय झाले आहेत. त्यांच्या प्रोडक्शनचा चित्रपट ‘द बिग बुल’ सध्याच डिजनी प्लेस हॉटस्टार वर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अभिषेक बच्चनने मुख भूमिका साकारली आहे.

अजय सध्या आपल्या होम प्रोडक्शन फिल्मम मे-डे च्या दिगदर्शनात व्यस्त आहेत, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सोबत अजय स्वतः लीड कास्ट स्टारचा भाग आहेत, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा पॅरलल भूमिकेत आहेत. या वर्षात अजय एसएस राजामौली यांचा चित्रपट RRR यामध्ये दिसतील. या चित्रपटात अजय यांचा लूक २ एप्रिलला त्यांच्या जन्म दिवसानिम्मित रिलीज करणार आहेत.

याशिवाय मैदान हा चित्रपटही रिलीजसाठी आहे, ज्यामध्ये अजय एका फुटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत. अजय, अक्षय कुमार यांचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ यामध्येही अजय त्यांच्या सिंघमच्या अंदाजात दिसतील. हा चित्रपट ३० एप्रिलला रिलीज होणार होती, परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे याला स्थगिती देण्यात आली आहे.

मोठ्या पडद्यावर अजय शेवटी २०२० मध्ये रिलीज झालेल्या ‘तान्हाजी-द अनसंग वोरीयर’ मध्ये दिसले होते, ज्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसमध्ये मोठे यश मिळाले होते. या चित्रपटात अजय यांनी तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. अजय यांची होम प्रोडक्शन फिल्म ‘त्रिभंग’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती, ज्यामध्ये काजल यांनी मुख्य भूमिका साकारली होती.