×
HomeमनोरंजनRRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या 'या' सिनेमाकडून का केली जातेय बक्कळ कमाईची...

RRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’ सिनेमाकडून का केली जातेय बक्कळ कमाईची अपेक्षा ? जाणून घ्या आरआरआरचा Full Form

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बाहुबली (Baahubali) चे डायरेक्टर एस एस राजामौली (S. S. Rajamouli) त्यांचा मेगा बजेट प्रोजेक्ट RRR वर काम करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. चाहत्यांनाही आरआरआर सिनेमाबद्दल खूप उत्सुकता होती. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली आहे.

सिनेमाच्या निर्मात्यांनी सोमवारी (दि 25 जानेवारी 2021) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, हा सिनेमा 13 ऑक्टोबर 2021 रोजी दसऱ्याच्या दोन दिवस आधी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. अभिनेत्री आलिया भट हिनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. आरआरआर सिनेमासाठी तयार व्हा. 13 ऑक्टोबर 2021 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल बोलायचं झालं तर 13 ऑक्टोबर रोजी बुधवार आहे. यामुळं सिनेमाला 5 दिवसांचा मोठा ओपनिंग वीकेंड मिळणार आहे. ट्रेड अ‍ॅनलिस्ट सिनेमाकडून मोठ्या कलेक्शनची आशा करत आहेत. सिनेमा बक्कळ कमाई करेल अशी सर्वांना आशा आहे. सिनेमाचं बजेटही 350-400 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.

2017 मध्ये आलेल्या बाहुबलीच्या दुसऱ्या भागानंतर राजामौली 4 वर्षांनंतर सिनेमा घेऊन येत आहेत. हे सुध्दा सिनेमा चर्चेत राहण्याचं एक कारण आहे. बाहुबली 2 सिनेमाच्या फक्त हिंदी व्हर्जननं 500 कोटींहून अधिक कमाई केली होती. हिंदी पट्टीतील एखाद्या साऊथ इंडियन सिनेमाचं हे खूप मोठं यश होतं.

आरआरआर सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर आरआरआर (RRR) चं पूर्ण नाव Roudram Ranam Rudhiram आहे. राजामौली बाहुबली सिनेमानंतर आता या सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत. हा एक पीरियड सिनेमा आहे. राजामौलींचा हा सिनेमा दक्षिणसोबतच उत्तर भारतीयांसाठीही खूप खास असणार आहे. कारण यात राम चरण, ज्युनियर एनटीआर यांच्या व्यतिरीक्त बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgan) आणि अ‍ॅक्ट्रेस आलिया भट हेही दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं ज्युनियर एनटीआर आणि राम चरण पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

हा सिनेमा अनेक भारतीय भाषांसोबतच तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही रिलीज होणार आहे. आरआरआर या सिनेमाचं एक मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमाच्या स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर यात स्वातंत्र्यापू्र्वीची म्हणजेच 1920 च्या आसपासची स्टोरी आहे. ही स्टोरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या दोन खऱ्या क्रांतिकारकांची आहे ज्यांची नावं आहेत अल्लूरी सीतारामा राजू आणि कोमारामा भीम.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News